घरताज्या घडामोडीशरद पवार मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत विजयी, विरोधी उमेदवाराचा २ मतांसह पराभव

शरद पवार मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत विजयी, विरोधी उमेदवाराचा २ मतांसह पराभव

Subscribe

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजय मिळवला आहे. २९-२ ने शरद पवार विजयी झाले आहेत. एकूण ३४ जणांपैकी २९ मतदारांचे निवडणुकीसाठा मतदान झाले. या निवडणुकीत विरोधी उमेदवार धनंजय शिंदे यांचा २ मतांसह परभव झाला आहे. मराठी ग्रंथ संग्रहालायलाच्या अध्यक्षतेसाठी शरद पवार आणि धनंजय शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत राजकीय वातावरण तयार झाले होते. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी धनंजय शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात निवडणूक होणार होती. यामध्ये एकूण ३४ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. ३४ पैकी ३१ मतदारांनी मतदान केलं यामध्ये फक्त २ मते विरोधी उमेदवार धनंजय शिंदे यांना मिळाली. शरद पवार यांना २९ मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत.

- Advertisement -

निवडणुकीवर विरोधकांचा अक्षेप

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीवेळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र ही साखर कारखाने किंवा बँकेची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेमध्ये गैरप्रकार सुरु असून याविरोधात न्यालयात जाणार अल्याचा इशारा धनंजय शिंदे यांनी दिला आहे.

संपत्ती हडपण्याचा प्रयत्न – मनसे

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक म्हणजे कोट्यावधी रुपयांची संपत्ती हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. ३४ जणांना मतदानाचा अधिकार असताना त्यातील १६ जणांचा समावेश का नाही असे सवाल मनसेकडून करण्यात आला आहे. आताचे कार्यकारी मंडळ अनधिकृत आहे. ते निवडणुका न घेता झालेलं आहे. ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक एक फार्स आहे. खरं तर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीवर डोळा ठेवून महाविकास आघाडीच्या लोकांनी निवडणूक घेतली असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा पुणे महापालिका काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात, दिवाळीनंतर घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -