घरमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकांबाबत राज ठाकरेंची मागणी शरद पवारांना अमान्य!

विधानसभा निवडणुकांबाबत राज ठाकरेंची मागणी शरद पवारांना अमान्य!

Subscribe

राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांसंदर्भात केलेली मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमान्य केली आहे.

सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याच साटंलोटं असल्याचे अनेक आरोप केले होते. लोकसभा निवडणुकांदरम्यान तर ‘बारामतीचा पोपट’ म्हणूनही टीका करण्यात आली होती. मात्र, याच्या बरोबर उलट गोष्टी सध्या राज्यात घडत असून राज ठाकरेंच्या काही मागण्यांना शरद पवार थेट नकार देत आहेत. त्यामुळे टीकाकारांना उत्तर मिळत असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे ‘राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आगामी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असताना, दुसरीकडे शरद पवारांनी मात्र ही मागणी चुकीची असल्याचं वक्तव्य केलं आहे. कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी या मागणीला स्पष्ट शब्दांत नकार दिला.


हेही वाचा – राज्य सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात संवाद झालाच नाही!-शरद पवार

‘४ जिल्ह्यांसाठी राज्यातल्या निवडणुका पुढे का?’

यावेळी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, राज्य सरकारने कशा प्रकारे मदतकार्य राबवलं पाहिजे, याबद्दलही त्यांनी काही सूचना केल्या. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंच्या मागणीविषयी विचारले असता, पवारांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘ही पूरस्थिती राज्यातल्या ४ जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली आहे. पण या ४ जिल्ह्यांसाठी संपूर्ण राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.


वाचा नक्की काय होती राज ठाकरेंची मागणी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -