घरमहाराष्ट्रधमक्या दिल्या तरी आवाज बंद होणार नाही, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

धमक्या दिल्या तरी आवाज बंद होणार नाही, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

या धमकीची काळजी मला नाही, पण याची काळजी सरकारने करावी, असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी त्यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाबाबत मत व्यक्त केले आहे.

या धमकीची काळजी मला नाही, पण याची काळजी सरकारने करावी, असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी त्यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाबाबत मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना आज (ता. 09 जून) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर फेसबुकवर “शरद पवार तुमचा दाभोलकर होणार” असे पोस्ट करत धमकी देण्यात आली. यानंतर तत्काळ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून आपले मत व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत; गृहमंत्री फडणवीसांकडून पोलिसांना कारवाईचे निर्देश

- Advertisement -

या धमकी प्रकरणावरून शरद पवार यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केले आहे. तर त्यांनी या प्रतिक्रियेतून धमकी देणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. या प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले की, या प्रकरणी राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्यांनी या संबंधीची काळजी घ्यायची आहे. या राज्यामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाला मत व्यक्त करण्याचा हक्क आहे. त्यामुळे धमक्या देऊन कोणाचा आवाज बंद करता येत असेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. त्यामुळे याची चिंता मी करत नाही तर ज्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

सकाळी ट्विटरवरून सौरभ पिंपळकर नामक व्यक्तीच्या ट्विटर अकाउंटवरून आधी पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या व्हॉट्सअपला याबाबतचा मॅसेज आला. त्यामुळे आता या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला उच्च परंपरा आहे. राजकीय नेत्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत. त्यामुळे कोणत्याही नेत्यांना धमक्या देणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणे हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात कायद्याप्रमाणे निश्चित कारवाई होईल. या प्रकरणावर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. “विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? कारण नसताना एका राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकारे बदनामीकार बोलण्याचा अधिकार कोणी दिला.? असे अजित पवार प्रसार माध्यमांसमोर म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -