घरमहाराष्ट्रशिंदे मंत्रिमंडळात कोरोना, मंत्री शंभूराज देसाई Covid 19 पॉझिटिव्ह

शिंदे मंत्रिमंडळात कोरोना, मंत्री शंभूराज देसाई Covid 19 पॉझिटिव्ह

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत माहीती देताना त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे.

मंगळवारी (28 मार्च) छगन भुजबळ यांना सुद्धा करोनाची लागण झाली होती. त्यांच्या पाठोपाठ आता शंभूराज देसाई यांना करोना झाल्याने राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला आहे. शंभूराज देसाई यांनी कोरोना झाल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे.

- Advertisement -

शंभूराज देसाई यांनी ट्विटरमध्ये म्हटले की, “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो.”

- Advertisement -

छगन भुजबळ यांनाही करोना
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना करोना झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली. सोमवारी (२७ मार्च) संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. ते सध्या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. भुजबळ यांनीही त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात 2 हजाराहून अधिक सक्रीय रुग्ण
महाराष्ट्रात मार्च महिन्यात २ हजाराहून अधिक सक्रिय करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३९७ नवे रुग्ण आढळले असून शनिवारच्या तुलनेत ही संख्या ४० ने कमी आहे. शनिवारी राज्यात ४३७ बाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकट्या मुंबईत रविवारी १२३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४३ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून यापैकी २१ ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -