घरताज्या घडामोडीShiv Sena : अभिनेता गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

Shiv Sena : अभिनेता गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्यात उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर केल्या जात आहेत. अशातच खासदार, आमदारांसह नेतमंडळी विविध पक्षात पक्षप्रवेश करत आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्यात उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर केल्या जात आहेत. अशातच खासदार, आमदारांसह नेतमंडळी विविध पक्षात पक्षप्रवेश करत आहेत. अशातच आज (28 मार्च) बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Shiv Sena Actor Govinda Ahuja Join Shinde Group of Shiv Sena Lok Sabha 2024)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेता गोविंदा अहुजा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अभिनेता गोविंदा अहुजा यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवाची कृपा म्हणून शिवजयंतीनिमित्त मला शिवसेनेत प्रवेश मिळाला. मी साल 2004 ते 2009 या कालावधीत राजकारणात होतो. त्यानंतर राजकारणातून बाहेर पडल्यानंतर मला वाटलं की मी पुन्हा राजकारणात दिसणार नाही. पण 2010 ते 2024 या 14 वर्षांच्या वनवासानंतर ज्या पक्षात रामराज्य आहे, त्याच पक्षातून मी माझी राजकीय वाटचाल पुन्हा सुरू करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे मला जे काम देतील ते मी योग्यरित्या पार करीन.

- Advertisement -

“गेली 14 ते 15 वर्ष मी बॉलिवूडपासून लांब होतो. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली माझ्यावर दिलेली कोणतीही जबाबदारी मी नीट पार पाडीन. विशेषत: मला कला आणि संस्कृती क्षेत्रात काम करायाल आवडेल. कारण विरारपासून बाहेर पडल्यानंतर माझं जगात नाव झालं आहे. महाराष्ट्र ही अशी भूमी आहे, जी चंद्रकृपेची भूमी आहे”, असेही गोविंदा अहुजा यांनी म्हटले.

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अनेक जण एकापक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटात बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा यांनी प्रवेश केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी करून दाखवले, पण एकनाथ शिंदेंचे काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -