शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, याचिकेवर 15 जून रोजी हायकोर्टात सुनावणी

मत बाद झाल्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. सुहास कांदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी होणार आहे.

Shiv Sena MLA Suhas Kande's petition in Mumbai High Court against Election Commission
शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, याचिकेवर 15 जून रोजी हायकोर्टात सुनावणी

राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत रद्द करण्यात आले आहे. मत रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून सुहास कांदे यांची मुंबई उच्च न्यायालयात घाव घेतली आहे. कांदे यांनी याचिका दाखल केली असून येत्या १५ जून रोजी यावर सुनावणी होणार आहे. माझी बाजू ऐकूण न घेता निवडणूक आयोगाने निकाल दिला असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये हाय होल्टेज ड्रामा सुरु होता. भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला होता. यामध्ये निवडणूक आय़ोगाने सुहास कांदे यांचे मत बाद केले होते.

राज्यसभा निवडणुकीमध्ये मत बाद केल्यामुळे सुहास कांदे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला एक-एक मत महत्त्वाचे असताना सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचा उमदेवार पराभूत झाला तर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. निवडणूक आयोगाने माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला तो मला मान्य नाही. माझी बाजू ऐकून घेतली पाहिजे होती. मत बाद झाल्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. सुहास कांदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी होणार आहे.

सुहास कांदेंकडून नियमांचे उल्लंघन

शिवसेना आमादर सुहास कांदे यांनी मतदान केल्यानंतर न दुमडलेली मतपत्रिका घेऊन फिरत होते. यावेळी त्यांची मतपत्रिका इतर लोकांनासुद्धा दिसत होती. मतपत्रिका केवळ पक्षप्रतोद यांना दाखवण्याचे नियमात आहे. यामुळे सुहास कांदे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा निकष निवडणूक आयोगाने लावला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यसभेची मतमोजणी

राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी सुरु करण्यात येणार होती. परंतू भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. तसेच शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. तर महाविकास आघाडीकडून अपक्ष आमादर रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाकडे तक्रार गेल्यानंतर तब्बल ११ तासानंतर मतमोजणी सुरु झाली. निवडणूक आयोगाने सविस्तर माहिती घेऊन सुहास कांदे यांचे मत बाद करुन जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांचे मत ग्राह्य धरलं आहे. परंतु निवडणूक आयोगाच्याविरोधात सुहास कांदे यांनी याचिका दाखल केली आहे.


हेही वाचा : काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नसून तो भाजपविरोधातील संताप….संजय राऊत