घरमहाराष्ट्र'या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत'; सतीश उकेंवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची भाजपावर...

‘या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत’; सतीश उकेंवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची भाजपावर टीका

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड टाकली. वकील सतीश उके यांच्या नागपुरातील घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. तसंच, याआधी अनेक महाविकास आघाडी सरकरामधील नेत्यांच्या घरी ईडीनं धाड टाकत कारवाई केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड टाकली. वकील सतीश उके यांच्या नागपुरातील घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. तसंच, याआधी अनेक महाविकास आघाडी सरकरामधील नेत्यांच्या घरी ईडीनं धाड टाकत कारवाई केली. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष भाजपावर टीका केली आहे. तसंच, ‘ज्याप्रकारे जम्मु-काश्मिरमध्ये अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात. त्याचपद्धतीनं या केद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत’ असं संजय राऊत यांनी म्हटलं.

”नागपुरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कारवाई झाली. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीनं कले असतील. त्यांनी जमीन लुटली असेल, जमीन बळकावली असेल, त्यानी कोणालातरी धमकी दिली असेल. या सगळ्याचा महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. यासाठी ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्या असा गुन्हा नाही. कोणत्याही राज्याचे पोलीस अशाप्रकारच्या गुन्ह्यांचे तपास करतात. मी म्हणतो सतीश उकेनं गुन्हा केला असेल, तर त्याच्यावर रितसर कारवाई व्हायला हवी. त्याच्या कुटुंबीयांनी लोकांना धमक्या दिल्या असतील. देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्यावर खोट्या तक्रारी दाखल केल्या असतील तर, या सर्वाची दखल घ्यायला महाराष्ट्र पोलीस आहेत. त्यासाठी ईडीनं आणि सीबीआयनं यायची गरज नाही. त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी आणलं जात आहे.”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

- Advertisement -

”विरोधकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी महाराष्ट्र पोलीसांकडे दाखल केल्या पाहिजेत. तसंच, कायदेशीर कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे. पण कालचा प्रकार हा धक्कादायक आहे. ज्याप्रकारे जम्मु-काश्मिरमध्ये अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात. त्याचपद्धतीनं या केद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत. घुसतात आणि अटक करून निघुन जातात. जर यामध्ये संघर्ष निर्माण झाला तर, केंद्र आणि राज्य हा मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण होईल. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी बिघर भाजपाशासीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं ते त्याच भुमिकेतून लिहीलं आहे. या सर्वामुळं केंद्रीय तपास यंत्रणाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.”, असंही राऊत यांनी म्हटलं.


हेही वाचा – नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर मूळ कारवाई नागपूर पोलिसांची, फडणवीसांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -