घरताज्या घडामोडीगोव्यात शिवसेना,राष्ट्रवादी एकत्र लढणार, शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

गोव्यात शिवसेना,राष्ट्रवादी एकत्र लढणार, शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

Subscribe

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढवेल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी दिली. वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत म्हणाले, गोवा विधानसभा निवडणूक एकत्रपणे लढवण्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले आहे. त्यानुसार येत्या 1८ जानेवारीला दोन्ही पक्षांतील जागावाटपावर चर्चा होईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल १८ जानेवारीला गोव्यात जागावाटपाच्या सूत्रावर शिवसेनेसोबत चर्चा करतील. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल. गोव्यात शिवसेना १० ते १५ जागा लढवण्याची शक्यता आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलेले आहे. मात्र, महाराष्ट्र आणि गोव्यातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सध्या तरी काँग्रेसने गोव्यात इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यातील निवडणुकीत आमच्यासोबत काँग्रेस नसेल, असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. त्यांना त्यांच्या मूळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अपर्णा यादव भाजपमध्ये जाणार असल्याचे मी ऐकले आहे. हे जाणून बरे वाटले, असेही राऊत म्हणाले. गोव्याची निवडणूक एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -