घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा...; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा…; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Subscribe

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांच्या घरी नऊ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेले. त्यावेळी ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांच्या घरी नऊ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेले. त्यावेळी ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले की, “जे काही आरोप करण्यात येत आहेत ते फक्त शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहेत. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. (Sanjay Raut Slam Eknath Shinde Faction Ed Office Patra Chawl Land Scam Case)

“हे सगळं दमनचक्र सुरु आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही. खरी शिवसेना काय आहे ते पाहता आहेत. माझ्या विरोधात खोटे कागदपत्रे, खोटे पुरावे लोकांना मारपीट करुन तयार करण्यात येत आहेत. महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी, शिवसेनेला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

“महाराष्ट्र कमजोर होणार नाही, शिवसेना कमजोर नाही, संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, महाराष्ट्रावर हल्ले करण्यात येत आहेत, पेढे वाटा, बेशरम लोक आहात तुम्ही पेढे वाटा.
सर्वांना माहिती आहे, माझ्या विरोधात चुकीचा गुन्हा लावण्यात आला आहे. ईडी मला अटक करणार आहे आणि मी अटक व्हायला जाणार आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती त्यानी केली होती.

- Advertisement -

२० जुलै रोजी, ईडीने संजय राऊत यांना मुंबईच्या उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. संसदेच्या अधिवेशनाचे कारण देत त्यांनी पुढची तारिख मागितली होती.


हेही वाचा – साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात; अटकेची दाट शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -