घरदेश-विदेशसोशल मीडियाच्या प्रोफाइलमध्ये तिरंगा ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

सोशल मीडियाच्या प्रोफाइलमध्ये तिरंगा ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

Subscribe

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत २ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल पिक्चर्समध्ये तिरंगा ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमांतर्गत केले.

- Advertisement -

आकाशवाणीवर दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम सादर केला जातो. आजच्या ९१व्या भागात देशातील नागरिकांशी संदेश साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उल्लेख केला. येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा’ या विशेष अभियानाचे आयोजन केले जाणार आहे. या अभियानात सहभागी होऊन सर्वांनी या काळात आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून या अभियानाचा हिस्सा बना, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. हे अभियान ‘आजादी का अमृत महोत्सवा’चा एक हिस्सा आहे.

हेही वाचा – शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुन्हा दिघे; आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंची नियुक्ती

- Advertisement -

पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला सुरुवात करताना स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण केले आणि ‘अमृत महोत्सव’ अभियानाअंतर्गत देशभरात आयोजित होत असलेल्या विभिन्न कार्यक्रमांचा उल्लेख केलेा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने आता एका लोकचळवळीचे रूप घेतले आहे. सर्व क्षेत्रे आणि समजाच्या प्रत्येक वर्गातील लोक, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होत असलेल्या या सगळ्या कार्यक्रमांमागचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की, आपण सर्व देशबांधवांनी आपल्या कर्तव्यांचे संपूर्ण निष्ठापूर्वक पालन करावे. तरच, आपण त्या अगणित स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न पूर्ण करु शकू. त्यांच्या स्वप्नातला भारत घडवू शकू. म्हणूनच, आपल्यापुढील २५ वर्षांचा हा अमृतकाळ, प्रत्येक देशबांधवांसाठी कर्तव्यकाळ असणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देत, आपले वीर सैनिक आपल्याला ही जबाबदारी देऊन गेले आहेत आणि आपल्याला ती जबाबदारी पूर्ण पार पडायची आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचाराज्यातील राजकीय सत्तानाट्यावर सुप्रीम कोर्टात आता 3 ऑगस्टला सुनावणी

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -