घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी शिवसैनिकांचे गाठले गुवाहाटी; पोलिसांनी घेतले ताब्यात

उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी शिवसैनिकांचे गाठले गुवाहाटी; पोलिसांनी घेतले ताब्यात

Subscribe

दरम्यान शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या रिडिसन हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही धडक मोर्चा काढला

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना आमदारांसह सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. एकनाथ शिंदे आधी सुरतमध्ये आणि नंतर थेट गुवाहाटीमध्ये दाखल झाल्याने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधणेही अवघड झालेय. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत परत येण्याचे भावनिक आवाहन केले. मात्र आवाहनाच्या उलटचं मोठ्या संख्येने शिवसेना बंडखोर आमदार शिंदेंच्या गटात सहभागी होत आहेत. यातच साताऱ्यातील काही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले होते. यावेळी या शिवसैनिकांपैकी संजय भोसले यांनी रेडिसन हॉटेलबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आसामा पोलिसांनी संबंधित शिवसैनिकाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

यावेळी संजय भोसले या शिवसैनिकांनी आमदार एकनाश शिंदे यांनी शिवसेनेत परत येण्याचे आवाहन केले आहे. संजय भोसले हे शिवसेनेचे सातारा उपजिल्हा प्रमुख आहेत. गुवाहाटीमध्ये त्यांच्यासोबत साताऱ्यातील इतरही काही कार्यकर्ते होते. यावेळी भोसले यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत यावे, हे सांगायला मी इकडे आले आहे असं म्हणत केंद्र सरकारने कितीही दडपण असले तरी शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडू नये. मी बाळासाहेबांचा आणि उद्धवसाहेबांचा शिवसैनिक आहे, असे आवाहन केले.

- Advertisement -

साताऱ्यातील या शिवसैनिकांच्या गुवाहाटी दौऱ्यातील आंदोलनामुळे महाराष्ट्रातील इतर राज्यातूनही शिवसेनेचे कार्यकर्ते गुवाहाटीमध्ये धडकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या रिडिसन हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही धडक मोर्चा काढला. गुरुवारी सकाळी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक हॉटेल परिसरात धडकले. त्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुवाहाटी पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पेचाची ठिणगी आता गुवाहाटीपर्यंत पोहचला आहे.


बंडखोर आमदार पालघर पोलीस संरक्षणात सीमापार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -