घरताज्या घडामोडीShivsena Aurangabad Aakrosh Morcha: महागाई आणि लोकांच्या प्रश्नांवरचे लक्ष हटवण्यासाठी भाजपने दंग्याला...

Shivsena Aurangabad Aakrosh Morcha: महागाई आणि लोकांच्या प्रश्नांवरचे लक्ष हटवण्यासाठी भाजपने दंग्याला केली सुरुवात – संजय राऊत

Subscribe

वाढलेल्या महागाई विरोधात आणि केंद्र सरकारविरोधात शिवसेनेचे औरंगाबादमध्ये शनिवारी आक्रोश मोर्चा काढला. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधताना राज्यातील भाजप आणि केंद्र सरकारवर सडेतोड टीका केली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, महागाईवरच लक्ष वळवण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न पुढे येऊ नयेत यासाठी भाजपने राज्यात दंग्याला सुरुवात केली.

औरंगाबादच्या भाषणात नक्की काय म्हणाले संजय राऊत?

भाषणाच्या सुरुवातील संजय राऊत म्हणाले की, समोर आहे ती खरी शिवसेना. भगवा झेंडा घेऊन शिवसैनिक उन्हा-तान्हात चालतोय, त्या माय-भगिनी महिला क्रांती चौकापासून ते गुलमंडीपर्यंत तळपत्या उन्हात महागाईविरोधात इथे पर्यंत चालत आल्या, हीच खरी शिवसेना. सरकार मंत्रालयात पण शिवसेना रस्त्यावरच. हिच शिवसेना, जी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अभिप्रत आहे. व्यासपीठांवर शिवसेनेचे सर्व प्रमुख चंद्रकांत खैर आहेत. आजच्या मोर्चाचे आयोजन अंबादास दानवे यांनी केली. संपूर्ण देशाला आजच्या मोर्चाचबद्दल जाणून घेण्याची उत्सुकत आहे. महागाई विरोधातील देशातील पहिला मोर्चा आहे, जिथे जनता रस्तावर उतरली आहे. हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश सगळ्यांच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

- Advertisement -

पुढे राऊत म्हणाले की, ‘महागाई विरोधातील मोर्चा हे काही शिवसेनेसाठी नवीन नाही. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे महागाई विरोधातील मोर्चाचे नेतृत्व करत होते. अनेकदा मीनाताई यांनी महागाई विरोधात मोर्चाचे नेतृत्व केले आहेत. वेळोवेळी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राची  जनता अशा संकटाशी सामना करत असते. तेव्हा बेपरवा होऊन शिवसेना रस्त्यावर उतरते आणि हा भगवा झेंडा घेऊन हा आक्रोश व्यक्त करत संघर्ष करत असते. हा खरंतर मोर्चा दिवाळीच्या अगोदर निघाला पाहिजे होता. पण लोकांना आपण दिवाली साजरी करू दिली. संभाजीनगरमधील घराघरावर भगवा झेंडे लावले आहेत. बहुतेक या भगव्या ध्वजाने आपल्याला प्रेरणा दिली की, अन्याय वाढला, महागाई वाढली आहे, रस्त्यावर उतरा, संघर्ष करा.’

‘पत्रकारांनी मला विचारले की, महाराष्ट्रात सरकार तुमचे आणि तुम्हीच महागाई विरोधात मोर्चा काढताय मी म्हटले, हो. महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. हा एका राज्याचा विषय नाही. पेट्रोल-डिझेलचा भाव कमी करणे हे राज्याच्या हातात नाही. पेट्रोलियन कंपन्या महाराष्ट्राच्या मालकीच्या नाहीत. तेलाच्या विहिरी आमच्या मालकीच्या नाहीत. २०१४ साली ७८ रुपये पेट्रोल होते, आज १२५ रुपये आहे. परवा ५ रुपये कमी केल्याच मी ऐकले, पण झाले की आहे माहित नाही. ५ रुपये कमी केले ते ५ रुपये काही शहरात कमी झाले की नाही. अजूनही १००च्या वरच दर आहेत. केंद्र सरकारने ५ रुपये कमी केले तर राज्य सरकार किती करणार? असा प्रश्न मला विचारला. तेव्हा मी म्हणालो की, केंद्र सरकारने ५० रुपये कमी करावे, मग राज्य सरकार विचार करेल. काही राजकीय पक्ष विचारता महागाई विरोधात मोर्चा काढताय हे ढोंग आहे. मग ५ वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होत्या. नक्की कोणते सिलेंडर रस्त्यावरती घेऊन आल्या होत्या. आता या स्मृती इराणी आणि त्यांचा पक्ष केंद्राने लादल्या महागाई विरोधात आंदोलन करणार असेल आम्ही त्यांचात सहभाग घेऊ
आमचा प्रश्न जनतेशी आहे. स्मृती इराणींनी संभाजी नगरला यावं. आम्ही त्यांना ५० सिलेंडर रिकामे देऊ, बसा रस्त्यावर,’ अशी खोचक टीका स्मृती इराणी यांच्यावर केली.

- Advertisement -

तुम्ही आमच्या तोंडाचा शेंगदाणाही काढून घेतायत

पुढे राऊत म्हणाले की, ‘आज अनेक ठिकाणी उज्ज्वला योजनेतील सिलेंडर भंगारात काढले आहेत. अनेक राज्यातील सिलेंडर भंगारात निघालेत. १०००च्या घरात स्वयंपाकाचा गॅस आहे, रॉकेट महाग आहे, डिझेल महाग आहे आणि शेंगदाणेसुद्धा महाग आहे. अरे शेंगदाणे तर स्वस्त ठेवा. काही लोकांची सोय संध्याकाळची असते. तुम्ही आमच्या तोंडाचा शेंगदाणाही काढून घेतायत. मग लोकांनी जगायच कसे. हे लोकांना जगूच देत नाहीत. इलेट्रिक मोर्टास, मोबाईल इन्कमिंग फ्री होत. आता चार्जिंग ७९ रुपये, गॅस सबशिडी कमी केली. ही काही गंमतीची गोष्ट नाही आहे.’

केंद्राच्या आर्थिक धोरणाला कंटाळून १७ हजार लहान व्यापारांनी आत्महत्या केली

‘गेल्या दोन वर्षामध्ये महागाई आणि केंद्राच्या आर्थिक धोरणाला कंटाळून १७ हजार लहान व्यापारांनी आत्महत्या केली आहे. या देशामध्ये लहान व्यापार, सर्वसामान्य महागाईमुळे मारला गेला आहे. आमचे नरेंद्र मोदी काय करतात. मोदींनी स्वतःसाठी सरकारच्या पैशातून विमान खरेदी केले. त्याची किंमत १८ कोटी रुपये आहे. परदेशात जाण्यासाठी हे विमान वापरले जाते. एअर इंडिया विकली १७ हजार रुपये कोटीला आणि विमान खरेदी केले १८ हजार कोटींना ही आपल्या देशाची स्थिती. अशा सरकारचं काय करायचे. माचिस बॉक्स ७५ पैसे होता, आता २ रुपये झाला आहे. सगळ्यात माचिस स्वस्त होती. रस्त्यात कोणीतरी माचिस मागितली तर आज लोकं देताना विचार करतात. या महागाईविरोधात रस्त्यावर उतरून आक्रोश करायचा नाही तर काय करायचं. हा आक्रोश मोर्चा महाराष्ट्रातल्या अशा शहरामध्ये निघालेला आहे, ज्या संभाजीनगरमध्ये अन्याया विरुद्ध, जुलामा विरुद्ध, निजामशाहीविरुद्ध फार मोठा लढा दिला आहे. हा लढासुद्धा सध्याच्या निजामशाहीविरुद्ध आहे. ज्याने आपल्यावरती महागाई लादली आहे. ही निजामशाही सुरू आहे. लोकांवरती तलवारीने, बंदुकीने हल्ले किंवा गोळ्या घातल्या म्हणजे अत्याचार होतो असे नाही. या महागाईचा बॉम्ब, हल्ला हा सुद्धा जुलूम आणि अत्याचार आहे,’ असे आरोप राऊतांनी केंद्रावर केला.

महाराष्ट्रात दंगली पेटवायचे कारस्थान सुरू

‘या राज्यात आपलं सरकार आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, मंत्री आपले आहेत, पण सरकारला काम करून द्यायचे नाही. सरकारची आर्थिक कोंडी करायची, रोज सराकरमधील मंत्र्यांच्या घरामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा पाठवून आमची नाकेबंदी करायची. सरकार पाडण्यासाठी, सरकार अस्थिर करण्यासाठी, मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्यासाठी रोज कारस्थान सुरू आहे. हे महागाईवर बोलत नाहीत. आज अमरावतीमध्ये दंगा झाला. त्रिपुरामध्ये काहीतरी घटना झाली आणि भाजपने दंग्याला सुरुवात केली. कारण महागाईवरच लक्ष वळवण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न पुढे येऊ नयेत. गेल्या दोन वर्षात साडे चार कोटी तरुण मंडळी बेरोजगार झाले आहेत. त्याच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मोदी म्हणाले होती, प्रत्येक वर्षी २ कोटी लोकांना नोकऱ्या देणार, अरे २ हजार जणांना तरी नोकऱ्या दिल्या का? १०० दिवसांत महागाई कमी करण्याचा वचन दिले होते, पण महागाई कमी झाली का? सरकार महागाई कमी करत नाही, महागाईचा प्रश्न विचारला तर भारत-पाकिस्तान, महागाईचा प्रश्न विचारला तर सर्जिकल स्टाईक, महागाईचा प्रश्न विचारला तर चीनची घुसखोरी, महागाईचा प्रश्न विचारला तर हिंदु-मुसलमान. अहो या देशाच्या प्रमुख समस्यांवर बोला ते सगळे सोडा आणि फालतू विषय ज्याचा सामान्य जनतेविषयी संबंध नाही. अशा विषयावरती लोकांना गुमराह करायच अशा प्रकारच राजकारण देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रात दंगली पेटवायचे कारस्थान सुरू झाले आहे. जस जसा केंद्र सरकारच्या विरोधात रोष आक्रोश वाढत जाईल तस तसा एकच मार्ग जाती आणि धार्मिक दंगली पेटवायच्या,’ असे राऊत म्हणाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -