घरताज्या घडामोडीसंजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची मुक संमती - आशिष शेलार

संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची मुक संमती – आशिष शेलार

Subscribe

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक, राजकीय कार्यक्रम करू नये असे आवाहन जनतेला केले होते. पण आज वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी येथील कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करून कोरोनाचा नियमांची पायमल्ली केल्याचे दिसले. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते Adv. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ‘धार्मिक, राजकीय कार्यक्रम करू नये आणि आम्ही करणार नाही. मग अशा पार्श्वभूमीवर सुद्धा संजय राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतोच कसा? त्याला परवानगी मिळते का? आणि ती कशी मिळाली? तिथे गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमली, त्याची माहिती गुप्त वार्ता माहिती विभागाला होती का नव्हती? गुप्त वार्ता विभागाने हेतुपुरस्सर गर्दी जमावी आणि प्रसार झाला तरी चालेल, असे धोरण आणि असे काम केले आहे का? या सगळ्या प्रश्नामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याला मुक संमती आहे, असा समज होतो. अन्यथा आम्ही विचारलेला प्रश्नाला उत्तर द्या, अदृश्य मंत्री दृश्य झाले, अदृश्य कारवाई दृश्य कधी होईल?’

पुढे आशिष शेलार म्हणाले की, ‘या कार्यक्रमाविषयी मुख्यमंत्री बोलत नाही आहेत, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची याला मुक संमती आहे, असाच होत आहे. उपमुख्यमंत्री थेट त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांच्याशी नेमके काय बोलतायत, याचे स्पष्टीकरण देत नाहीत. त्यामुळे सगळेच प्रकरण गुलदस्त्यात टाकल्यासारखे झाले आहे. लपाछपवी करण्याचे काम केले जात आहे.’

- Advertisement -

‘ढाल समाजाची आणली गेली, तरी जिच्या नावाने हे सर्व प्रकरण सुरू झाले आहे, ती सुद्धा भगिनी त्याच समाजाची आहे. त्यामुळे एक मोठं कटकारस्थान यापद्धतीच्या गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्याचे कारण होतंय. आजपर्यंत पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव होता, पण आता पोलीस यंत्रणेवर आम्ही सामाजिक दबाव टाकू, हिंमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा पद्धतीचा संदेश दिला जातोय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मिळून याविषयात नेमके काय घडले आहे? हे समोर आणणे गरजेच आहे,’ असे आशिष शेलार म्हणाले.


हेही वाचा – जय राठोड हाच पूजा चव्हाण हिचा हत्यारा- चित्रा वाघ

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -