घरताज्या घडामोडीशिंदे गटाला जे हवंय ते सगळं कसं मिळतं?, अनिल देसाईंचा सवाल

शिंदे गटाला जे हवंय ते सगळं कसं मिळतं?, अनिल देसाईंचा सवाल

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे नाव जाहीर करण्यात आले. तसेच ठाकरे गटाच्या चिन्हावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु शिंदे गटाला अद्यापही चिन्ह मिळालेलं नाहीये. त्यामुळे त्यांना कोणतं चिन्ह मिळणार हे पाहणं महत्त्त्वाचं आहे. दरम्यान, शिंदे गटाला जे हवंय ते सगळं कसं मिळतं?, असा सवाल शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी उपस्थित केला.

अनिल देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिंदे गटाने मागावं, विचारावं ते आधीच ठरलेलं आहे की काय अशी शंका मनात येते. त्यांच्या आणि या संस्थांच्या विचारांचं गणित एवढं जुळतंय की हा सुद्धा एक चमत्कारिक प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो, असंही देसाई म्हणाले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही स्वीकारला आहे. पण या स्वायत्त संस्थांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रिया सुद्धा पाहायला हव्यात अशी अपेक्षा आहे. भारताच्या लोकशाहीचा कणा असलेल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी पाहावं, असं अनिल देसाई म्हणाले. शिंदे गटाकडून आता तळपता सूर्य, तलवार-ढाल आणि पिंपळाचं झाड अशा तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. आता निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेणार आहे.

शिवसैनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही – अमोल मिटकरी

- Advertisement -

जनसंघ, काँग्रेस या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसैनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.


हेही वाचा : भाजपाला टार्गेट करत, नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या नावावरून शिंदे गटाला केले ट्रोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -