घरताज्या घडामोडी'धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य' अफू वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला...

‘धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य’ अफू वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नका, शिवसेनेची मोदींवर टीका

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत उभारण्यात आलेल्या काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले. मंदिरांचे जिर्णोध्दार पंतप्रधान करत आहेत. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य आहे. त्यामुळे फक्त अफू वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नये असा खोचक निशाणा शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथमध्ये ७०० कोटी खर्च करुन स्वप्न पूर्ण केले यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत टीकास्त्रही डागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरांच्या जिर्णोध्दाराचे मनावर घेतलं आहे. महात्मा गांधी यांची देखील तीच इच्छा होती. परंतु अंगावर राख फासून आणि भगवी कपडे घालून, कपाळाला भस्म लावून राज्यकर्त्यांना मंदिरं उभारता येतील पण राष्ट्र घडवता येणार नाहीत. मंदिरे किंवा धार्मिक स्थळे अध्यात्माची ऊर्जा केंद्रे आहेत. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य आहे. त्यामुळे फक्त अफू वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. ज्या तत्परतेने काशीतील विकास केला तशीच तत्परता नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील दाखवायला हवी अशी टीका सामानाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

ज्या गंगेत मोदींनी डुबकी मारली त्यामध्येच प्रेते वाहत होती

देशात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. यावर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गंगेमध्ये डुबकी मारली त्याच गंगेमध्ये कोरोना काळात हजारो प्रेते वाहून गेली असल्याचे जगाने पाहिले आहे. मोदींनी वाराणसीचा खासदार म्हणून जी विकासकामे मंदिरे उभारण्यात केली. मात्र पंतप्रधान म्हणून नाही तर खासदार म्हणून मोदींनी त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी जायला पाहिजे होते. गंगा आक्रोश करत असताना काशीचे खासदार तेथे गेले नाही. देशात राजकीय वातावरण बिघडले आहे. अशा परिस्थितीमध्ये धर्म आणि अध्यात्म जगण्यासाठी ऊर्जा देत आहे. मोदींनी काशीतील गंगेत स्नान केले त्या गंगास्नाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीचे किल्मिषे नष्ट होवोत तसेच काशीच्या मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचा जिर्णोद्धार होवो असा खोचक टोला शिवसेनेच्या सामना संपादकीयमधून लगावण्यात आला आहे.


हेही वाचा : औरंगजेबाचा अत्याचार वाढतो तेव्हा या भूमीत छत्रपती शिवाजी उभे ठाकतात

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -