घरताज्या घडामोडीNagar Panchayat election result 2022: अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना धक्का; सोयगाव नगरपंचायतीचा...

Nagar Panchayat election result 2022: अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना धक्का; सोयगाव नगरपंचायतीचा गड सेनेने राखला

Subscribe

सोयगाव नगरपंचायत निवडणूक जिंकल्यानंतर औरंगाबाद महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असे राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले

औरंगाबादच्या सोयगाव नगरपंचायतीत (Soygaon Municipal Council Election) ११ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने गड राखला आहे. तर भाजपला सहा जागांवर विजय मिळाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यामध्ये एकूण १७ जागांपैकी ११ जागेवर विजय मिळवून अब्दुल सत्तार यांनी बाजी मारून सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.

सोयगाव नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी चार जागांसाठीचे मतदान काल, मंगळवारी झाले होते. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ जागांवर २१ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. आज, बुधवारी सोयगाव नगपंचायतीसाठी मतमोजणी पार पडली. मजमोजणीनुसार ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवून ६ जागांवर विजय भाजपने मिळवला आहे. यामुळे सोयगाव नगरपंचायतीचा गड अधिक मत मिळवून शिवसेनेने राखला आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

वर्षभरापासून या निवडणुकीची असलेली प्रतिक्षा अखेर आज संपली आहे. पण ही निवडणुक होताच सोयगावात आता नगराध्यक्ष पदाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. यासाठी भाजप आणि शिवसेनाच अग्रेसर आहे. त्यामुळे नराध्यक्षपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच सारीपाट रंगणार आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक जिंकल्यानंतर औरंगाबाद महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.


हेही वाचा – Beed Nagar Panchayat: सत्ता असूनही यश मिळण्यात सत्ताधारी पडले कमी; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -