अखेर प्रतीक्षा संपली! सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक प्रकियेत महाविकास आघाडीच्या मतदानात फाटाफूट झाल्याचं पाहायला मिळालं. बैठकीच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीचे चार संचालक गैरहजर होते, तर कालांतराने तीन संचालक उपस्थित राहिल्याने सात संचालक हजर झाले. मात्र आठ संचालक असलेल्या महाविकास आघाडीत एका संचालकाने निवड प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

सिंधुदुर्गः जिल्हा बँकेची सत्ता अखेर भाजपच्या ताब्यात गेलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या अतुल काळसेकरांनी बाजी मारलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत 11- 7 मतांनी दोघांचा विजय झाला असून, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय.

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक प्रकियेत महाविकास आघाडीच्या मतदानात फाटाफूट झाल्याचं पाहायला मिळालं. बैठकीच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीचे चार संचालक गैरहजर होते, तर कालांतराने तीन संचालक उपस्थित राहिल्याने सात संचालक हजर झाले. मात्र आठ संचालक असलेल्या महाविकास आघाडीत एका संचालकाने निवड प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

त्यामुळे सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडीत सरळ फूट पडल्याचे दिसून आले. जिल्हा बँक अध्यक्ष निवडीकरिता भाजपाकडून मनीष दळवी तर उपाध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डोन्टस आणि उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण अखेर भाजपानं या निवडणुकीत बाजी मारलीय.

विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव केल्यामुळे “जायंट किलर” ठरलेले कणकवलीचे विठ्ठल देसाई यांचे नाव चर्चेत आहे, तसेच संचालक मनीष दळवी हे तरुण आहेत आणि राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपाप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनलचे 11 संचालक निवडून येत निर्विवाद बाजी मारल्यानंतर अध्यक्षपदाकरिता भाजपाकडून बँकेच्या निवडणुकीच्या कोअर कमिटीमध्ये असलेले व मतदानाचा हक्क न बजावता देखील बहुमताने विजयी झालेले मनीष दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तबानंतर ते विजयी झालेत. तर उपाध्यक्ष पदी अतुल काळसेकरांची वर्णी लागलीय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मनीष दळवी व अतुल काळसेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

———————————————

हेही वाचा : चुकीच्या चाचण्या, कोविड रिपोर्टमुळे पनवेलच्या नागरीकांमध्ये घबराट