घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग विमानतळावर कोल्ह्यांना हुसकवण्यासाठी गर्जणार वाघाची डरकाळी

सिंधुदुर्ग विमानतळावर कोल्ह्यांना हुसकवण्यासाठी गर्जणार वाघाची डरकाळी

Subscribe

चिपी विमानतळ परिसरात एक कोल्ह्याच टोळक वास्तव्य करून आहे, बऱ्याच वेळा या टोळीतील कोल्ह्याचा वावर विमानतळावरील धावपट्टीवर असतो व याचा फ़टका बरयाचवेळा विमानसेवेला बसला आहे. धावपट्टिवर येणाऱ्या या कोल्ह्यांना हाकलवण्यासाठी आता एक नामी शक्कल लढवण्यात येत असून चक्क विमान येण्याच्या पूर्वी ध्वनिक्षेपकावरून वाघाच्या डरकाळीचा आवाज काढला जात आहे. त्याची जिल्ह्याभरात एकच चर्चा सुरु आहे.

चिपी विमानतळ सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी धावपट्टीवर कोल्यांचा वावर वाढला. काहीवेळा तर विमान उतरण्याबपूर्वी पायलटला आकाशात घिरटे मारावे लागले होते. त्यानंतरही विमान लँडिंग आणि टेक अप करण्यात पूर्वी या कोल्ह्यांचा मोठा अडथळा विमानतळ प्रशासनाला होऊ लागला. यावर उपाय म्हणून वनविभागाच्या वतीने धावपट्टीच्या खडकाळ भागात कोल्हे पकडण्यासाठी पिंजरे लावले होते मात्र हा उपाय ही यशस्वी झाला नाही.  म्हणूनच आता या कोल्हयांचा बंदोबस्त करण्यासाठी नवी शक्कल लढवून विमान येण्यापूर्वी विमान धावपट्टी भागात ध्वनिक्षेपकावरून वाघाच्या डरकाळीचा आवाज काढला जात आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर वाढत आहे. त्यानंतर बिबट्याने संरक्षण भिंतीवरून मारलेल्या उडीची देखील जोरदार चर्चा झाली. त्यामुळे आता कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धावपट्टीवर ध्वनीप्रक्षेपकाद्वारे वाघाची डरकाळी ऐकालय मिळणार आहे. या वाघाच्या डरकाळीची सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.


बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू ; ठाणे वर्तकनगरमधील घटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -