घरमहाराष्ट्रपुणेAjit Pawar Interview : नेतृत्वाबद्दल विश्वास हवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख कुणाकडे?

Ajit Pawar Interview : नेतृत्वाबद्दल विश्वास हवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख कुणाकडे?

Subscribe

कोल्हापुरातील कणेरी मठ येथे 29 जानेवारी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (महाराष्ट्र) आयोजित दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याचा अधिवेशनात अजित पवारांची मुलाखत देखील आयोजित करण्यात आली होती.

कोल्हापूर : मराठीसह हिंदी चित्रपटात कणखर भूमिका साकारणारे अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 29 जानेवारी रोजी मुलाखत घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर परखड भाष्यं केलं. आपली भूमिका स्पष्ट असेल तर प्रश्न येत नाही, पण भूमिका बदलायची असेल तर ती लोकांना पटवून द्यावी लागते. लोकांना तुमचा विश्वास वाटावा लागतो. तो विश्वास नसेल तर सगळे कठीण होत जाते. नेमके तसेच, कार्यकर्त्याच्या मनात पक्षनेतृत्वाबद्दल विश्वास असावा लागतो. नाहीतर मग भूमिका बदलण्याची वेळ येते.
असं परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी व्यक्त केलं. तेव्हा अजित पवारांचा रोख कुणाकडे होता? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.  (Ajit Pawar Interview Leadership requires trust Who has Deputy Chief Minister Ajit Pawars cash)

कोल्हापुरातील कणेरी मठ येथे 29 जानेवारी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (महाराष्ट्र) आयोजित दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याचा अधिवेशनात अजित पवारांची मुलाखत देखील आयोजित करण्यात आली होती. ही मुलाखत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी घेतली. या मुलाखतीत अजित पवारांनी देशातील आणि राज्यातील सध्याचे राजकारण तसेच जुन्या काळातील आठवणी सांगितल्या. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीतील फूट आणि राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबतही भाष्य केलं.

- Advertisement -

राजकीय भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, नाना पाटेकर यांनी अलीकडे सांगितले, त्यांचे वडील काँग्रेस विचारधारेचे होते. कारण तेव्हा काँग्रेस होती. त्यानंतर नाना शिवसेनेकडे झुकले, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नाना पाटेकर असो दादा कोंडके यांना पटले, त्यानंतर आता त्यांना भाजपाचे विचार आवडते. त्यामुळे एक व्यक्ती, तोच कलाकार पण त्या त्या काळात त्यांच्याही मनात मतपरिवर्तन झाले. त्यालाही कारणे असू शकतात असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा : Maratha Reservation : दगाफटका झाला तर मंडल आयोगाला आव्हान; जरांगेंचा इशारा

- Advertisement -

मोदींच कौतुक आणि भाजपवर निशाणा

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करा म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात वंदे भारत ट्रेन, हायवे मोठे करण्याच काम, परदेशात भारताचं स्थान वेगळं निर्माण झालं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आता आपण एकत्रित आहोत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. जनता जनार्दन जे ठरवेल तेच होते. सध्या बिहारमध्ये जे घडले आहे, ते थोडसं वेगळ आहे. आम्हाला असं कळलं की, तिथे नितीश कुमार यांच्या पक्षातील आमदार फोडण्याच काम सुरू होतं. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असाही गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला.

हेही वाचा : Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोगवर कारवाई करण्याची महापालिका कर्मचाऱ्यांची मागणी, काय आहे प्रकरण?

लोकांना विकास हवा असतो, त्यामुळेच सत्तेत

राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी का झालो याबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, नुसते विरोधी पक्षात बसले म्हणजे विकास करता येत नाही. तुम्ही फक्त विरोध करू शकता, सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता. सातत्याने जनतेला जागरुक ठेवण्याचे काम करावे लागले. विरोधी पक्षाला भूमिका मांडावी लागते. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता लोकांना माझी कामे झाली पाहिजे, माझ्या गावचा, वॉर्डाचा विकास झाला पाहिजे असा त्यांचा कल असतो. गेल्या सव्वाचार वर्षाच्या काळात महाराष्ट्राने सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -