घरताज्या घडामोडीपत्रकार परिषद शरद पवारांची पण चर्चा सोनिया दुहान यांची; कोण आहे त्या?...

पत्रकार परिषद शरद पवारांची पण चर्चा सोनिया दुहान यांची; कोण आहे त्या? वाचा सविस्तर

Subscribe

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहिर केले. शरद पवार यांची ही पत्रकार परिषद निवृत्ती मागे घेत असल्याची घोषणा केली. परंतु, शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पाहायला मिळाले. या नेत्यांपैकी शरद पवारांच्या मागेच बसलेल्या युवा कार्यकर्त्या सोनिया दुहान यांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहिर केले. शरद पवार यांची ही पत्रकार परिषद निवृत्ती मागे घेत असल्याची घोषणा केली. परंतु, शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पाहायला मिळाले. या नेत्यांपैकी शरद पवारांच्या मागेच बसलेल्या युवा कार्यकर्त्या सोनिया दुहान यांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सोनिया दुहान या शरद पवारांच्या विश्वासू तरुण सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. पण सोनिया दुहान या नेमक्या कोण आहे हे आपण जाणून घेऊयात. (Sonia Duhan Sharad Pawar NCP Maharashtra)

लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक कार्यकर्तांना रडू आवरलं नाही तर, एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु तीन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला.

- Advertisement -

शरद पवारांच्या याच पत्रकार परिषदेत त्यांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc केले. त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या.

सोनिया दुहान यांनी वयाच्या २१ व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली विद्यापीठात 2 निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व केले. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या. युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे गायब होते. ज्यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता.

- Advertisement -

भाजपाच्या गळाला लागलेल्या या सगळ्या आमदारांना परत आणण्यासाठी सोनिया दुहान यांचा मोलाचा वाटा आहे. कारण गुरुग्राम या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधून सोनिया दुहान यांनी या सगळ्यांना परत आणले. शरद पवार यांना २०१९ झालेल्या सकाळच्या शपथविधीच्या वेळी एका आमदाराचा मेसेज आला. आम्हाला दिल्लीतल्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये कोंडल्याचा उल्लेख त्यात होता. त्यावेळी सोनिया दुहान आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचे लोकेशन शोधले होते.

गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे 4 आमदार असल्याचे त्यांना कळले. त्या हॉटेलमध्ये सोनिया दुहान आणि धीरज शर्म गेले. तिथे भाजपाचे 100 ते 150 कार्यकर्ते होते. हे सगळेजण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर सोनिया आणि धीरज यांनी हॉटेलच्या मागच्या दाराने जिथे कुठेच सीसीटीव्ही वगैरे नव्हते तिथून या आमदारांना खुबीने बाहेर काढले. या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आले.

याशिवाय, गतवर्षी गुवाहाटीतून गोव्याला आलेले शिंदे गटाचे आमदार गोव्यातील ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी सोनिया दुहान आणि श्रेया कोठीवाल यांनी बोगस कागदपत्रं देऊन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.


हेही वाचा – शब्द मागे घेऊन महाराष्ट्राची क्षमा मागावी; आव्हाडांचं जग्गी वासुदेव यांना आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -