घरदेश-विदेशManipur Violence : आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू; राज्यात 10,000 जवान तैनात

Manipur Violence : आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू; राज्यात 10,000 जवान तैनात

Subscribe

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराची परिस्थिती तिसऱ्या दिवशीही संवेदनशील आहे. राज्यात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे 10,000 जवान राज्यात तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या हिंसाचार आटोक्यात आला आहे. (The situation of violence in Manipur remains sensitive for the third day)

बुधवारी (३ मे) मणिपूर राज्यातील चुरचंदपूर जिल्ह्यात असलेल्या तोरबांग येथे ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढला होता. यानंतर या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये आग धूमसताना दिसत आहे. राज्यातील हिंसाचार वाढत असल्याने या ठिकाणचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे. मणिपूरमध्ये आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे, हे मृतदेह इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, चुराचंदपूर आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय गोळ्या लागल्याने 100 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर RIMS आणि जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

13,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले 
लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मणिपुरमधील तणावग्रस्त भागातून आतापर्यंत 13,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. चुराचंदपूर, कांगपोकपी, मोरे आणि ककचिंगमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. पण तरीही पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

माझं राज्य मणिपूर जळत
भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमने (Mary Com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदत मागितली होती. तिने म्हटले की, “माझं राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा.” यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमधील जाळपोळ, हिंसाचाराचे काही फोटो शेअर केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -