घरमहाराष्ट्रएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी मिळणार ६ महिन्यांची रजा

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी मिळणार ६ महिन्यांची रजा

Subscribe

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी आता सहा महिन्यांची रजा मिळणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांना देखील ही रजा मिळू शकणार आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार ६ महिन्यांची रजा

महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने महिलांच्या भरतीला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्यामुळे महामंडळात वाहक पदासह इतर विविध पदांवर सध्या मोठ्या संख्येने महिला काम करीत आहेत. यात विशेष करुन ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या मुलींची संख्या अधिक आहे. एसटी महामंडळातील नोकरीमुळे या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत आहे. एसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती काळात ६ ऐवजी ९ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. असा निर्णय घेणारी देशातील एसटी महामंडळ ही एकमेव संस्था असून त्याच्याच पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

यासाठी घेण्यात आला निर्णय

नोकरी करीत असताना या महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा आपल्या मुलांकडे लक्ष देणे शक्य होऊ शकत नाही. विशेषत: परिक्षांच्या वेळी मुलांना आपल्या पालकांची अधिक गरज असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांनिर्णय घेण्यात येत आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले आहे. पत्नी हयात नसलेले पुरुष तसेच ज्या पुरुष कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली ना १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा आहे. अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्ती महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे. मुलाचे वय १८ वर्षाचे होईपर्यंत ही रजा घेता येईल. एका वर्षात दोन महिन्यांच्या कमाल मर्यादेत ही रजा घेता येणार असून पहिल्या दोन ज्येष्ठतम मुलांकरीता ही रजा घेता येणार आहे.


वाचा – खुशखबर! एस.टी महामंडळाची ‘मेगा भरती’; चालक वाहकाची ४२४२ पदे भरणार

- Advertisement -

वाचा – एसटी घेणार नव्या कोर्‍या ७०० बसेस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -