घरमहाराष्ट्रदिवाळीत निघणार एसटी प्रवाशांचं दिवाळ

दिवाळीत निघणार एसटी प्रवाशांचं दिवाळ

Subscribe

यंदा दिवाळीत एसटीची भाडेवाढ १० टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे दिवाळीच्या सणामध्ये नातेवाईकांकडे जाणाऱ्या एसटी प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

दिवाळी सणानिमित्त बऱ्याच कर्मचाऱ्यांना, शाळकरी मुलांना सुट्ट्या असतात. या सुट्ट्यांच्या दिवसात अनेक नागरिक दिवाळी सणाचेऔचित्य साधून आपल्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींकडे जातात. तर बरेच नागरिक एसटीचा प्रवास करुन गावी देखील जातात. मात्र एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे एसटी दिवाळ काढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्टीत एसटीची भाडेवाढ होणार असल्याने याचा फटका एसटी प्रवाशांना बसणार आहे. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळांने एसटीची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ १० टक्क्यांनी होणार असून १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधी दरम्यान ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यासाठी करण्यात आली भाडेवाढ

एस.टी.महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने भाडेवाढ करण्यात येते. ३० टक्क्यांपर्यंत ही भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरुपाची एसटी भाडेवाढ करण्यात येते. यानुसारच यंदा दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय १० टक्के अशी भाडेवाढ केली जाणार आहे. ही भाडेवाढ येत्या ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

- Advertisement -

दरवर्षी होते इतकी भाडे वाढ

दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत एसटीची भाडेवाढ होते. दरवर्षीप्रमाणे यंदाची भाडे वाढ झालेली नाही. दरवर्षी १५ आणि २० टक्क्यांनी भाडे वाढ होते. मात्र यंदा ही भाडे वाढ १० टक्क्यांनी होणार आहे.

वाचा – आजी, माजी आमदारांना एसटीचा प्रवास मोफत

- Advertisement -

वाचा – एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा!

वाचा – खुशखबर….आता ग्रामीण भागातील मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत पास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -