घरताज्या घडामोडीकरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा, कॉलेजांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी

करोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा, कॉलेजांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा दहावी बारावी बोर्डाची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार

मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, कॉलेजांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी जाहीर केला. सर्व शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर केली असली तरी राज्यातील नऊ विभागीय मंडळात सुरु असलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. बोर्डाच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठ पातळीवर घेण्यात येणार्‍या परीक्षा देखील वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्यासहीने यासंदर्भातील निर्णय शनिवारी जाहीर करण्यात आला आहे.


हेही वाचा – Coronavirus: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ‘एवढी’ रक्कम

- Advertisement -

मुंबईसह राज्यात करोना विषाणूचा प्रभाव वाढत चालला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात एकूण २० करोनाग्रस्त रुग्ण समोर आले असून त्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखीन काही करोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे अनेक खबरदारीचे उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी पालकवर्गांकडून करण्यात आली होती. मात्र राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या परीक्षांचा माहोल लक्षात घेता शाळांना सुट्टी देण्याबाबत अनेक शाळा कॉलेजांनी एकमत दर्शविले नव्हते. मात्र अखेर राज्य सरकारने यासंदर्भातील निर्णय जाहीर करीत राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. यात राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, सरकारी, खासगी शाळांना हा नियम लागू करण्यात आला आहे. शाळांप्रमाणेच कॉलेजे, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

letter
राज्यातील शाळा कॉलेजांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -