खुशखबर! नोव्हेंबरपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांनी वाढ

सरकरी कर्मचारी त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांत्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांनी वाढ

state government employees Dearness allowance increased by 11 per cent since November 2021
खुशखबर! नोव्हेंबरपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांनी वाढ

यंदाची दिवळीत राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास असणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  नोव्हेंबर महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकरी कर्मचारी त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही ११ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी २,२२० वाढ होईल तर जास्तीत जास्त ७,१०० रुपयांनी वाढ होईल अशी माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आणखी गोड होईल यात काही शंका नाही.

आपण पाहिले तर केंद्र सरकारने १ जुलै २०२१ पासून महागाई भत्त्यात वाढू करुन भत्ता १७ टक्क्यांवरुन २८ टक्क्यांवर आणला होता. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर २०२१ची थकबाकी संदर्भात आदेश काढण्यात आले. या वाढीत १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासूनच्या महागाई भत्त्यांचा समावेश करण्यात आला.

१ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या काळातील महागाई भत्त्याचा दर हा १७ टक्के इतकाच राहिल. जवळपास १७ लाख कर्मचारी आणि साडेसहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या महागाई भत्त्याच्या वाढीचा फायदा होणार आहे.


हेही वाचा – भाजपाला धक्का; डेलकर कुटुंबाचा शिवसेनेत प्रवेश