जे जे हॉस्पिटलमुळे आयुष्याला अर्थ आला

कोकण मर्कंटाईल बॅंक प्रस्तुत माय महानगर आणि आपलं महानगर आयोजित कलामंदिर नवदुर्गोत्सवात दुसऱ्या माळेसाठी डॉ.रागिणी पारेख या सहभागी झाल्या होत्या. देशातील नामवंत नेत्रतज्ञ अशी डॉक्टर रागिणी पारेख यांची ओळख आहे. सर जेजे रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून दिली . मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात जन्माला येऊन मराठमोळ्या मुंबईत वाढलेल्या रागिणी पारेख यांनी आतापर्यंत शेकडो शिबिरांमधून राज्यातील गरीब आणि कष्टकरी जनतेला नेत्र उपचार मिळवून दिले आहे. माय महानगरशी संवाद साधताना डॉक्टर पारेख यांनी आपल्या यशोगाथेचा उलगडा केला आहे.