घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश, 'ब्रह्मगिरी' संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश, ‘ब्रह्मगिरी’ संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

Subscribe

नाशिक : तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील काही परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने येथील निसर्ग, डोंगरदर्‍या सुरक्षित राहण्यास आणि निसर्ग पर्यावरणाचा र्‍हास थांबण्यास मोठी मदत होणार आहे. गोदावरीचे पावित्र्य वाढविणे आणि ब्रह्मगिरीची हिरवळ टिकवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात असून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला मोठे यश आले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.

मागीलवर्षी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी भागात होणार्‍या उत्खननावर निसर्गप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर हा विषय कोर्टापर्यंत गेला होता, यासाठी पर्यावरण प्रेमींनी सातत्याने लढा दिला, तर जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, वनमंत्री, वनसचिव आणि निसर्गप्रेमींची बैठक पार पडली होती.

- Advertisement -

त्यानंतर आता यावर शासनाने राजपत्रद्वारे सूचना काढत त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास १०० चौरस किलोमीटर परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार आता त्र्यंबकेश्वरच्या परिसरासह ब्रम्हगिरी आणि गंगाद्वारचा परिसर देखील संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर काही नागरिक गाव, सर्वे क्रमांक, गट क्रमांक राखीव क्षेत्र याची माहिती मिळविण्यासाठी शासनाचे राजपत्राचे निरीक्षण करीत आहेत. दरम्यान, वनविभागाच्या अखत्यारीत त्र्यंबकेश्वर, हरसूल आणि नाशिक क्षेत्राचा काही भाग येतो. तसेच पूर्वी वाढोलीपासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत अभयारण्य होते. मात्र सध्या तसे राहिले नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -