Election Results 2022 : हे सर्व पक्ष देशहितासाठी, जनहितासाठी कधीही एकत्र आले नाहीत – सुधीर मुनगंटीवार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशातील सर्व पक्षाने भाजपविरूद्ध एकत्र येण्याचा प्रयत्न केला. पक्षांचं एकत्र येण्याचं लक्ष हे चुकीचं आहे. हे देशहितासाठी , जनहितासाठी आणि लोकहितासाठी कधीही एकत्र आलेले नाहीयेत. मोदी हटाव हा एकच विचार त्यांचा आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाच्या पंतप्रधानपदी घोषणा झाली. त्याअगोदर त्यांनी गुजरातचा राज्यकारभार उत्तम करून गुजरातचे निर्णय हे देशामध्ये कशापद्धतीने लोकप्रिय केलेत याचे जाणीव आहे. महाराष्ट्रातल्या सरकारचा मद्य विक्री करणाऱ्या लोकांसाठी समर्पित सरकार आहे. या सरकारच्या निर्णयामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले.

हे नक्की श्रेय कुणाचं?

यशाचं श्रेय हे मोदींच्या परीश्रमात कार्यकर्त्यांच्या श्रमाला आणि ईश्वराचा अंश असलेल्या जनतेच्या आशीर्वादाला द्यावा लागेल. या श्रेयासाठी प्रत्येकाने आपलं योगदान दिलेलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी व्यवस्थितपणे कार्य केल्यामुळे हे श्रेय सर्वांचं आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

खुर्चीसाठी आणि भारतीय जनता पार्टीचं तुष्टीकरण हे लक्ष भाजपचं कधीच राहीलं नाही. विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने निवडणुका लढवल्या. जातीच्या राजकारणा ऐवजी द्वेष या व्यतिरिक्त विकासाच्या मार्गाने विचार केलंय. आता या चारही राज्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन वेगाने जनहितासाठी विकासाची गाडी वेगाने धावेल, असा विश्वास असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळाच्या बाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.


हेही वाचा : Assemlby Election results 2022 : पंजाब वगळता सत्ताधाऱ्यांवरच जनतेने विश्वास दाखवला, पवारांकडून केजरीवालांचे कौतुक