‘सत्ता आली पण पत्ता गेला’ सुमित राघवनचा उद्धव ठाकरेंना टोला!

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी शिवजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडेल. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या राजकीय खलबतानंतर अखेर महाविकासआघाडी सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. या सगळ्या घटनेवर सुमित राघवनने उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ असं ट्वीट सुमितने केलं आहे.

“गड आला पण सिंह गेला” पण आज म्हणावं लागेल…”सत्ता आली पण पत्ता गेला” मातोश्री ते सिल्वर ओक.#बाळासाहेब_ठाकरे असं ट्वीट सुमीत ने केलं आहे. ‘सत्ता आलि पण पत्ता गेला’ अस म्हणत त्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे सुमीतने आणखी एक ट्वीट केलं आहे.

काल देखील सुमीतने ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने खूप प्रयत्न केले. यावेळी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. तिन्ही पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. यावर अभिनेता सुमित राघवनने खोचक टीका केली आहे. सत्ता स्थापनेनंतर आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का, असा सवाल अभिनेता सुमित राघवनने उपस्थित केला आहे.

सुमितने ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ट्रायडंट,रेनेसन्स,ललित,हयात या हॉटेल्स शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवण्यात आले होते. पण या हॉटेल्सच्या मेनू कार्डमधून मात्र खिचडी हा पदार्थ या आधीच वगळण्यात आला आहे. पण आता या हॉटेल्सची बिलं कोण भरणार? बहुधा शेतकरी’, असा उपरोधिक टोला सुमितने लगावला.