घरदेश-विदेशमहिला आरक्षण विधेयकाला पाठींबा, पण.... सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली स्पष्ट भूमिका

महिला आरक्षण विधेयकाला पाठींबा, पण…. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली स्पष्ट भूमिका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसंच, इंडिया या विरोधकांच्या आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयकाला त्यांनी पाठिंबा असल्याचं सांगितलं. सोबतच त्यांनी या विधेयकात SC, ST, OBC ला सहभागी करून घ्या, अशी मागणीही केली आहे.

नवी दिल्ली: महिला आरक्षणाच्या विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यासाठी ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसंच, इंडिया या विरोधकांच्या आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयकाला त्यांनी पाठिंबा असल्याचं सांगितलं. सोबतच त्यांनी या विधेयकात SC, ST, OBC ला सहभागी करून घ्या, अशी मागणीही केली आहे.

संसदेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर होणाऱ्या चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या विधेयकाला माझा पाठिंबा आहे, परंतु या विधेयकात SC, ST, OBC ला सहभागी करून घ्यायला घ्यायला हवं. तुमच्याकडे सभागृहात 303 चं बहुमत आहे. तसंच, अनेक राज्यांमध्ये मोडतोड करून तुमचं सरकार आहे, तर त्यांनी एससी, एसटी, ओबीसी महिलांनाही लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण दिलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच, मराठा आणि धनगर आरक्षणावरही संसदेत चर्चा व्हावी, असं इच्छा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

सुप्रिय सुळे यांनी अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. अमित शाह म्हणाले होते की, भाऊ बहिणीचं कल्याण करतो, यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीचे कल्याण करु शकतील, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला मताचा अधिकार दिला. महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला.
माझे वडील शरद पवार यांनी महाराष्ट्रात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण दिले आहे. प्रमिला दंडवते यांनी सर्वप्रथम महिला आरक्षणाचे प्रायव्हेट बील आणले होते.

- Advertisement -

माझ्या वडिलांनी शरद पवार आणि आई प्रतिभा पवार यांनी ठरवलं होतं की एकच मुलं होऊ द्यायचं, मग ते मुलगा असो किंवा मुलगी. 50 वर्षांआधी हा निर्णय घेणं म्हणजे कौतुकास्पद आहे, असं म्हणत त्यांनी सांगितलं की, माझ्या जन्मानंतर आईचं ऑपरेशन नाही तर बाबांनी ऑपरेशन करत फ‌ॅमिली प्लॅनिंग केलं होतं आणि याचा मला अभिमान आहे.

सुळे पुढे म्हणाल्या की, भाजपची मानसिकता महिलांच्या विरोधात आहे. ते माझ्या सारख्या महिला खासदाराला घरी जा, चूल आणि मूल बघं, असं म्हणतात, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा दाखला दिला.

(हेही वाचा:  पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -