घरमहाराष्ट्रचहावाल्याने असा साजरा केला 'प्रजासत्ताक दिन'

चहावाल्याने असा साजरा केला ‘प्रजासत्ताक दिन’

Subscribe

प्रजासत्ताक दिनानिमित्त बरेच देशभक्त अनेक उपक्रम राबवत असतात. असाच एक उपक्रम पिंपरी - चिंचवडमधील 'चहा'चा व्यवसाय करणाऱ्या एका नागरिकांनी राबवला आहे. निलेश वाकळे या व्यावसायिकांने १ रुपयात चहा आणि मस्का पावचे आयोजन केले होते. या उपक्रमाला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला.

समाजाच काहीतरी देणं लागतो या भावनेतून हिंजवडी येथील वाकळे अमृतुल्यने प्रजासत्ताक दिनानिमित्त चक्क १ रुपयात चहा आणि मस्कापाव ग्राहकांना दिला होता. याचा गोडवा हिंजवडी मधील असंख्य संगणक अभियंत्यांनी घेतला आहे. पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या त्यांच्या या उपक्रमामध्ये तब्बल ४ हजार लोकांनी चहाचा आस्वाद घेतला.२४ वर्षीय निलेश गजानन वाकळे यांनी हात गाडीपासून व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आज त्यांचा हा चहाचा व्यवसाय जोरात चालत आहे. त्यामुळे त्यांनी तरुणांना व्यवसायात उतरण्याचा सल्ला देखील दिला आहे.

चहा व्यवसायातून कमावतात १३ हजार रुपये

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्त नागरिक कोणते ना कोणते उपक्रम राबवत असतात. याच भावनेतून वाकळे यांनी आपण १ रुपयात चहा आणि मस्कापाव द्यायचा असं ठरवलं होतं. ते त्यांनी सत्यात उतरवलं आणि शनिवारी पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत शेवटचा ग्राहक येईपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवला होता. यात मोठ्या संख्येने संगणक अभियंते, स्थानिकांनी उपस्थिती लावली होती. एक रुपयाचा चहा असल्याने शनिवारी तब्बल ३ हजार ७०० कप चहाचा खप झाला आहे. वाकळे अमृत्यूल्य हे हिंजवडी येथे असल्याने मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंते याचा आस्वाद घेताना दिसले.

- Advertisement -

निलेश वाकळे यांच्याविषयी थोडक्यात

निलेश यांचे शाळेत मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी व्यवसायात स्वतःझोकून दिले. त्यांचं शिक्षण हे दहावी पर्यंत झालं असून आज ते यशस्वी व्यवसायिकाकडे वाटचाल करत आहेत. ते दररोज १२ ते १३ हजार रुपये या व्यवसायातून कमावत आहेत. त्यामुळे तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यसाय करावा असं निलेश यांनी सांगितले. तसेच त्यांना वडील आणि मोठा भाऊ या व्यवसायात हातभार लावत आहेत. काही वर्षांपूर्वी निलेश हे हिंजवडी येथील आयटीपार्क मध्ये हात गाड्यावर व्यवसाय करत असत. तर चहा पोहे हे त्यावेळी खूप चालायचे. मात्र याच आयटीपार्क मध्ये मोठा व्यवसाय करायचा चंग निलेश यांनी बांधला होता. तो त्यांनी काही प्रमाणात सत्यात उतरवला आहे. निलेश यांनी अनेक व्यवसाय केले त्यात अपयश आले. मात्र त्या अपयशाला खचून न जाता निलेश यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि आज ते चांगले व्यवसायिक असून आज त्यांची दोन चहाची हॉटेल आहेत. त्यामुळे कुठलाच व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो, असं त्यांनी सांगितले आहे.


वाचा – ‘उरी’च्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन!

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -