घरताज्या घडामोडीनांदेड जिल्ह्यात १० दिवसांचा नाईट कर्फ्यू

नांदेड जिल्ह्यात १० दिवसांचा नाईट कर्फ्यू

Subscribe

नांदेड जिल्ह्यात १० दिवसांचा नाईट कर्फ्यू

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा खाली गेलेला आलेख पुन्हा एकदा वरच्या दिशेने जाताना दिसत असल्यामुळे राज्यातील नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि मुंबईच्या काही भागात अंशत:ला लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आजच नागपूरमध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यात १० दिवसांचा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

काय आहेत नियम?

नांदेड जिल्ह्यात दहा दिवसांचा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा कर्फ्यू १२ मार्च ते २१ मार्च दरम्यान असणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यात येणार आहे. तर कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नांदेडमध्ये लग्न सोहळ्याला पन्नास लोकांची मर्यादा असणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याव्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात आज १३ हजार ६५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर बुधवारी राज्यात ५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे असले तरी राज्यात आज ९ हजार ९१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात २० लाख ९९ हजार २०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.२१ टक्के इतका आहे. राज्याचा मृत्यूदर २.३४ टक्के इतका आहे. राज्यात आता ४ लाख ७१ हजार १८७ लोक होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार २४४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.


हेही वाचा – नागपुरात ७ दिवसांचा लॉकडाऊन; नियमावली जाहीर

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -