‘त्या’ दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी फडकावला राष्ट्रध्वज; आपलं सगळं काही भारतात म्हणत परतण्याची मागणी

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली. या मोहिमेला देशभरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली. या मोहिमेला देशभरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे एका दहशतवादाच्या कुटुंबीयांनीही भारताचा राष्ट्रध्वज फडकावला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतासह पाकिस्तानात त्याची चर्चा रंगली आहे. दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला आहे. त्यानिमित्ताने शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी दहशतवाद्यांना एक संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे. (Terrorists Family Hoisted The Tricolour At Home In India Har Ghar Tiranga)

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी शाहनवाज याचे कुटुंबीय अजूनही भारतात राहत आहेत. रविवारी शाहनवाजच्या कुटुंबीयांनी घरी भारताचा राष्ट्रध्वज फडकावत त्याला एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. शाहनवाजने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी इच्छा त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तसेच, आमचे सर्वकाही हिंदुस्तानात आहे, पाकिस्तानशी आमचा कोणाताही संबंध नाही, असे म्हटले.

शाहनवाज कंठचे 22 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देत दहशतवादी बनवले होते. त्याचे कुटुंबीय किश्तवाड येथील हुलर गावात राहतात. रविवारी अब्दुल रशीद कंठ आणि त्यांचा दुसरा मुलगा नवाज कंठ यांनी नगर परिषदचे अध्यक्ष सज्जाद यांना फोन करुन तिरंगा देण्यास सांगितले होते. त्यानुसार नगर परिषद अध्यक्ष सज्जाद यांनी अब्दुल रशीद कंठ यांना तिरंगा दिला. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत घरावर मोठ्या दिमाखात ध्वजारोहण केले.

दरम्यान, दहशतवाद्यांकडून अजून हल्ले केले जात असून, जम्मी-काश्मीरमधील नागरिक त्यांच्या टार्गेटवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांचा फौजफाटा वाढवण्या आला आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.


हेही वाचास्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह राजकीय नेत्यांना दिल्या देशवासियांना शुभेच्छा