घरताज्या घडामोडीTET Scam : 2018च्या टीईटी परीक्षेतही अपात्र परिक्षार्थी पात्र, 1,778 विद्यार्थ्यांचे फुटले...

TET Scam : 2018च्या टीईटी परीक्षेतही अपात्र परिक्षार्थी पात्र, 1,778 विद्यार्थ्यांचे फुटले बिंग

Subscribe

2019-20 च्यापरीक्षानंतर आता 2018 मधील परीक्षांमध्ये देखील घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडे अपात्र विद्यार्थ्याची नावांसहीत यादी आहे. यातील अनेक विद्यार्थी हे सेवेत रूजू आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्यावर टांगती तलवार असणार आहे. या प्रकरणा खोल तपास पुणे पोलीस करत आहेत.

TET Scam : 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) हजाराहून अधिक बोगस उमेदवार आढळून आले होते. पुणे सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना आता 2018 मध्ये झालेल्या परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासात एकूण 1 हजार 778  विद्यार्थ्यांचे बिंग फुटले आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासात दररोज नवीन खुलासा समोर येत असल्याने टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परीक्षेच पात्र ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेण्यात आले आहेत. कोट्यावधींची उलाढाल करण्यात आली असून या परीक्षेतील 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागले असल्याची माहिती समोर आली आहे.

2019-20 च्यापरीक्षानंतर आता 2018 मधील परीक्षांमध्ये देखील घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडे अपात्र विद्यार्थ्याची नावांसहीत यादी आहे. यातील अनेक विद्यार्थी हे सेवेत रूजू आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्यावर टांगती तलवार असणार आहे. या प्रकरणा खोल तपास पुणे पोलीस करत आहेत.

- Advertisement -

2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत  8 हजाराहून अधिक बोगस उमेदवार आढळून आले होते. पुणे सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना आता 2018 च्या परीक्षांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 17 हजाराहून अधिक उमेदवार गैर मार्गाने पास झाल्याने समोर आले आहे. त्यापैकी सव्वा दोनशे बोगस सर्टिफिकेट आहेत. तर अर्ध्यांनी मार्क्स मॅन्युपुलेट केले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे सायबर पोलिसांकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा –  बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -