घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचौकशा सुरू असल्यानेच ठाकरे गटाकडून मोर्चा; दादा भुसे यांचा टोला

चौकशा सुरू असल्यानेच ठाकरे गटाकडून मोर्चा; दादा भुसे यांचा टोला

Subscribe

नाशिक : मुंबई महापालिका मुख्यालयावर ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. विचारले असता पालकमंत्री दादा भुसे यांनी अनेकांच्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असल्याने मोर्चा काढला जात असल्याचे सांगत ठाकरे गटावर टिका केली. नाशिक येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दादा भुसे यांनी विविध विषयांवर संवाद साधला.  1 जुलै रोजी ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर दादा म्हणाले की, ठाकरे गटातील अनेक नेत्यांच्या पाठीमागील काळातील गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात येत आहे. अनेकांच्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असल्याने मोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे मालेगावात हिंदू संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. यावर ते म्हणाले की, लोकशाहीत मोर्चा काढणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.”जेव्हा भूमिका घ्यायची असते, तेव्हा मालेगावचे हिंदू लोक घेतात. त्यामुळे यावेळी त्यांनी मोर्चाची भूमिका घेतली असून ते योग्यरीत्या पार पाडतील,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांचे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी सरकार ठरले आहे. वर्ष उलटूनही या सरकारला मंत्रीमंडळ विस्तार करता आलेला नाही. राज्यात सुमार दर्जाची कामे सुरू आहेत अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या टिकेचा समाचार भुसे यांनी घेतला. राज्यात पादर्शकपणे व गतीशीलपणे कामे व्हावीत याकरीता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांनी निराशेपोटी असे मनोगत व्यक्त केले असावे अशी टिका भुसे यांनी केली. पवार उपमुख्यमंत्री असताना ते धडाक्याने कामे करीत होते. आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होतो. त्यांच्या कामांचा धडाका एवढा होता की आम्हालाही दूर सारले जात होते असा टोला भुसे लगावला.

मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना’

गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू आहेत. यावर भुसे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आहे. सगळेजण अतिशय पारदर्शक आणि गतीमानपणे काम करत आहेत. चार दिवसांपूर्वी जळगावला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी लाखों लोकांचा सहभाग असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -