…तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल; राऊतांचा केशव उपाध्येंना इशारा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांना शिवी घातली. त्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांना शिवी घातली. त्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याप्रकरणात उडी मारली असून, संजय राऊत यांनी दिलेल्या शिवीचा संदर्भ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जोडला आहे. त्यावरून आता संजय राऊत आणि केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवॉर सुरू झाला आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams BJP Speaker Keshav Upadhye On Narayan Rane Tweet)

नेमके प्रकरण काय?

खासदार संजय राऊत यांना आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे भांडूपमध्ये होते आणि त्यांनी आरोप केला की… असा एक प्रश्न पत्रकार विचारत असतानाच त्याला मध्येच थांबवत, “अरे सोड रे *** आहे तो”, असे संजय राऊत म्हणाले. नेमके याचवेळी दुसरा पत्रकार राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौराबाबत प्रश्न विचारत होता.

याच प्रश्न-उत्तरांच्या गोंधळावरून केशव उपाध्ये आणि संजय राऊत यांच्यात ट्विटरवॉर सुरू झाला आहे. संजय राऊत यांच्या उत्तरानंतर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाराष्ट्राच राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल ही भाषा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा अपमान आपण करत आहात. मतभेद असू शकतात पण ही भाषा? असा सवाल करत संजय राऊत यांच्याकडे माफीची मागणी केली.

केशव उपाध्ये यांच्या या ट्वीटवर संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “केशवराव हे फालतूचे धंदे बंद करा! रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण क्लिप दाखवा आणि कॉमेंट करा.. महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, संजय राऊत यांनी नारायण राणे यांनी शिवी दिल्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शिवीगाळ केली. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत ही शिवीगाळ केली आहे. त्यांनी “त्या चु** उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार.” तसेच “भिकार** संज्या राऊत तू जिथे दिसशील तिथेच फटके घालणार, तुला आता सोडणार नाही.” असं ट्विट केलं आहे. यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – महामार्गावरून गाडी नेण्यापूर्वी FASTagबाबतची ही माहिती जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड