घरमहाराष्ट्रमुंबईत ठाकरे विरुद्ध शेलार सामना रंगणार

मुंबईत ठाकरे विरुद्ध शेलार सामना रंगणार

Subscribe

बावनकुळे हे विदर्भातील असून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्ती मानले जातात. बावनकुळे २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते फडणवीस सरकारमध्ये उर्जा मंत्री होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शुक्रवारी प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले. त्यानुसार प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश नेतृत्वपदी ओबीसी तर मुंबईत मराठी नेतृत्व देऊन भाजपने सामाजिक आणि भाषिक समतोल साधला आहे. मुंबई महापलिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने शेलार यांच्याकडे मुंबईचे नेतृत्व सोपवल्याने मुंबईत शेलार विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सामना रंगणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्टला पार पडला. विस्तारात चंद्रकांत पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांचा समावेश झाल्याने भाजपमध्ये संघटनात्मक बदल अपेक्षित होते. त्यानुसार आज नवी दिल्लीतून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

राज्यात ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून मोठा गदारोळ झाला होता. भाजपने ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यात भाजपला ओबीसी जातींचा असलेला जनाधार लक्षात घेऊन भाजपने बावनकुळे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली आहे. बावनकुळे हे विदर्भातील असून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्ती मानले जातात. बावनकुळे २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते फडणवीस सरकारमध्ये उर्जा मंत्री होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते.

तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्याचा फटका भाजपला विर्दभात बसला होता. त्यामुळे भाजपने आपली चूक सुधारून बावनकुळे यांना पक्ष संघटनेत सरचिटणीसपद देऊन आणि नंतर विधान परिषदेवर निवडून आणून त्यांचे पुनर्वसन केले होते. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती आल्याने बावनकुळे यांची जबाबदारी वाढली आहे. भाजपने  लोकसभेला महाराष्‍ट्रातून ४५ आणि विधानसभेला २०० जागा निवडून आणण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य नेत्यांच्या मदतीने विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

मुंबईत भाजपचा झेंडा फडकविण्याचे आव्हान

कुशल संघटक आणि शिवसेनेशी सरळ दोन हात करण्याची राजकीय क्षमता असलेले आशिष शेलार यांच्यासमोर मुंबई महापलिका निवडणूक स्वबळावर जिंकण्याचे आव्हान आहे. मुंबईची सूत्रे मंगल प्रभात लोढा यांच्या हाती जाण्यापूर्वी शेलार यांनी २०१३ पासून सलग दोन टर्म मुंबई भाजपचे अध्यक्षपद भूषविले आहे. २०१७ ची मुंबई महापालिका निवडणूक भाजपने शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या नाकीनऊ आणले होते. भाजपने स्वबळावर  ८२ जागा जिंकून शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या जागेत फक्त दोन जागांचे अंतर होते. आता मुंबईत शिवसेनेतील शिंदे गटाला सोबत घेऊन ठाकरे गटावर मात करण्याचे आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.


हेही वाचाः ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान, सरपंचांचीही थेट जनतेतून निवड होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -