घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या होमपीचवर ठाकरेंचा षटकार, शिवसेनेतील मरगळ दूर होणार?

मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवर ठाकरेंचा षटकार, शिवसेनेतील मरगळ दूर होणार?

Subscribe

सातारा – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राजकीय खेळीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात गट निर्माण झाले आहेत. कार्यकर्ता पातळीपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडे फूट पडली आहे. शिंदे गटात गेलेल्यांनाही गटाकडून अनेक पदं मिळाली आहेत. तर, ठाकरे गटात (Thackeray Group) राहिलेल्या अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांनाही आता चांगली पदं मिळू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांनी चांगल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना हेरून जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – एक दुबळं, मानसिक दृष्ट्या अपंग सरकार राज्यात बसलंय; संजय राऊतांची टीका

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम पीचवर म्हणजेच साताऱ्यात उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची खेळी खेळली आहे. सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून शेखर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपा नेते जयकुमार गोरे यांचे ते बंधू आहेत. म्हणजेच, शेखर गोरे यांना जिल्हा संपर्क प्रमुख करून ठाकरेंनी शिंदेविरोधात तगडा चेहरा उभा केला आहे. हाच चेहरा भाजापालाही धोबीपछाड करू शकेल.

सातारा जिल्ह्यांत शेखर गोरे यांचा चांगलाच वरचष्मा आहे. सहकारी शिंदे गटात गेलेले असताना शेखर गोरे मात्र, निष्ठावान शिवसैनिकांप्रमाणे शिवसेनेतच राहिले. शरद पवारांविरोधात आव्हान उभं करण्याइतपत राजकीय ताकद शेखर गोरे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना मैदानात उतरवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात सामील

शिंदे गटात गेलेले आमदार ठाकरे गटात येण्याकरता शेखर गोरे काय पावले उचलतात हे पाहावं लागणार आहे. तसंच, साताऱ्यात शिवसेनेला आलेली मरगळ शेखर गोरे यांना दूर करता येईल का याकडेही सर्वांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवर खेळलेली ही राजकीय खेळी यशस्वी झाल्यास शिवसेनेला उभारी येण्याची शक्यता आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -