घर उत्तर महाराष्ट्र मुलींची छेड काढणार्‍या टवाळखोरांना नागरिकांनीच दिला ‘प्रसाद’

मुलींची छेड काढणार्‍या टवाळखोरांना नागरिकांनीच दिला ‘प्रसाद’

Subscribe

नाशिक : सातपूर येथील अशोकनगर परिसरात अल्पवयीन मुलींची टवाळखोर सातत्याने पाठलाग करून छेड काढत होते. बुधवार (दि ३०) रात्री हा प्रकार स्थानिक रहिवासी समजला असता स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन टवाळखोरांना परिसरातील नागरिकांनी चोप देऊन सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

अशोक नगर परिसरात हनुमान मंदिर व मॉडर्न शाळे समोर अनेक दिवसापासून शाळेतील व परिसरातील अल्पवयीन मुलींचा काही टवाळखोर शालेय परिसरात खासगी क्लास, घराजवळ मुलीचा पाठलाग करीत त्रास देत होते. मंदिर शाळा खासगी कलासेस परिसरात टवाळखोर दररोज हा प्रकार सुरु होता. यामुळे मुलीच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. अशोकनगर हनुमान मंदिर परिसरात मुलींची छेड काढत असताना काही मुलांना स्थानिक नागरिकांनी पाहिले असता दोन टवाळखोर नागरिकांनी पकडून त्यांना जागेवरच त्यांना चोप देत समज दिली.

- Advertisement -

नागरिकांनी सातपूर पोलिसांना कॉल करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन टवाळखोरांना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन टवाळखोरांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर परिसरात शाळा, क्लासेस, उद्यान या ठिकाणी टवाळखोरांकडून खुलेआम मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दररोज शाळा सुरु होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी महिलांसह स्थानिक नागरिक करत आहेत.

पैसे मागितल्याने एकास मारहाण

 पैसे मागितल्याच्या रागातून ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी गल्ल्यातील रोकडवर डल्ला मारत विक्रेत्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करून चहाच्या टपरीचे नुकसान केले. ही घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली असून, या घटनेत उकळत्या चहासह दुकलीने माल फेकून दिल्याने विक्रेत्याचे े नुकसान झाले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आव्हाड व दिनेश राममहर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संजय किसन साळवे यांनी तक्रार दाखल केली आहे. साळवे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय असून, ते पाथर्डी फाटा परिसरातील उड्डाणपुलाखाली आपली टपरी लावतात. सोमवारी (दि.२८) सायंकाळी दुकानावर आलेल्या संशयितांकडे साळवे यांनी पैशांची मागणी केल्याने ही घटना घडली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -