घरमहाराष्ट्रपप्पू कलानी यांचे जेल बाहेर येण्याचे स्वप्न भंगले

पप्पू कलानी यांचे जेल बाहेर येण्याचे स्वप्न भंगले

Subscribe

१४ वर्षांनंतर मिळणाऱ्या शिक्षा माफीबाबत केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुले पप्पू कलानींची जेल बाहेर येण्याची शक्यता मावळली आहे.

येरवडा जेलमध्ये कारावास भोगत असलेले उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या शिक्षेला १३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. पुढील वर्षी त्यांची शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यांनी १४ वर्षांनंतर मिळणाऱ्या शिक्षा माफीबाबत केलेला अर्ज
न्यायालयाने फेटाळल्यामुले पप्पू कलानींची जेल बाहेर येण्याची शक्यता मावळली आहे. फेब्रुवारी १९९० साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदानावरून भाजप नेते घनश्याम बठीजा आणि पप्पू कलानी यांच्यात वाद झाले होते. या वादातूनच त्याच दिवशी सांयकाळी घनश्याम बठीजा हे पिंटो पार्क येथे बाहेर उभे असताना झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यु झाला होता. हा खुन पप्पू कलानी यांनी केल्याची फिर्याद घनश्याम यांचे भाऊ इंदर यानी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली होती. तसेच पोलीस सरंक्षणाची मागणीही केली होती. मात्र पोलीस सरंक्षण असून सुध्दा २८ एप्रिल १९९० साली इंदर हे पिंटो पार्कमध्ये असताना बाबा गॅब्रियल, बच्ची पांडे, श्याम किशोर गरीकापट्टी, हर्षद आणि रिचर्ड यानी इंदर यांची निघृण हत्या केली होती. या दोन्ही प्रकरणाचे प्रमुख सुत्रधार म्हणून पप्पू कलानी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.

कलानी यांना आजन्म कारावासाची शिक्षा

इंदर बठीजा हत्या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाने ३ डिसेंबर २०१३ रोजी पप्पू कालानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात कलानी यांच्या कुटुंबियानी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आल्यामुळे हताश झालेल्या पप्पू कालानींची रवानगी येरवडा तुरूंगात करण्यात आली आहे. या शिक्षेतून सूट मिळावी यासाठी कलानी कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयपर्यंत धाव घेतली. मात्र फिर्यादी कमल बठीजा यांच्या पाठपुराव्यामुळे कलानी यांच्या सुटकेची शक्यता फार कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलानी यांची शिक्षा आजन्म कारावास अशी बदलली आहे.

- Advertisement -

कलामींना सोडल्यास कमल बठीजांच्या जीवाला धोका

१९९० च्या दशकात पप्पू कलानी यांना पहिल्यांदा अटक झाली होती. त्यावेळी त्यांनी ७ वर्ष २ महिने कारावासाची शिक्षा भोगली होती. त्यानंतरच्या काळात ते जामिनावर बाहेर होते. १९ नोव्हेंबर २०१३ पासून कलानी ५ वर्ष ५ महिने कारावासाची शिक्षा भोगत आहे. यामुळे आतापर्यंत कलानीने जवळपास १३ वर्ष शिक्षा भोगली आहे. उत्तम वर्तन असणाऱ्या कैद्यांना १४ वर्षानंतर उर्वरित शिक्षेतून माफी देण्यात येते. फी माफी मिळविण्यासाठी पप्पू कलानीने हा अर्ज केला होता. या अर्जावर अभिप्राय मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, न्यायाधिश हातरोटे आणि जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठविला होता. या तिघांनी कलानीवर ६५ गुन्हे दाखल असून कलानी हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे तसेच कलानीला सोडल्यास कमल बठीजा यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने नकारात्मक अहवाल दिला आहे. यापैकी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांचा अभिप्राय सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

कलामीने माझा भाऊ इंदर बठीजाची हत्या ही तो पोलीस सरंक्षणात असताना केली होती. तसेच पप्पू कलानीने महापालिकेच्या पोटनिवडणूक लढवीत असताना मला आणि माझ्या सुरक्षा रक्षकाला मारले होते. कलानी हा कायदा मानत नाही, सत्तेचा दुरुपयोग करतो. यामुळे १४ वर्षानंतर शिक्षा माफीला पात्र न ठरविल्याबाबत बठीजा यांनी शासकीय कमिटीचा आभारी आहे.
– कमल बठीजा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -