Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मद्यपी बापाने रागात मुलाच्या मांडीचा घेतला चावा

मद्यपी बापाने रागात मुलाच्या मांडीचा घेतला चावा

मुलाच्या तक्रारीनंतर वडिलांवर गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

दारुच्या नशेतील वडिलांना घरातील सामान इकडचे तिकडे केल्याचा जाब विचारल्याने रागात येत बापाने चक्क मुलाच्या मांडीलाच चाव घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना चिंचवड भागातील ताथवडे घडली आहे. याप्रकरणी मुलाने दारुड्या बापाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. किरण दिनकर मोरे ( 55, रामनगर, ताथवडे) असे दारुड्या वडिलांचे नाव असून मुलगा राहुल किरण मोरे (वय 27) यांने याप्रकरणी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी वडिल किरण याला दारूचे व्यसन आहे. या व्यसनामुळे मुलगा राहुल याच्यासोबत त्याचे नेहमी खटके उडत होते. बुधवारी रात्रीही किरण दाऊ पिऊन घरी आला. त्यावेळी घरात राहुलची बहीण आणि आजी होत्या. घरी आल्यानंतर किरण याने घरातील संगणक, टीव्हीसह काही सामान इकडचे तिकडे करुन ठेवले होते. यावेळी मुलगा राहुलने वडिलांना जाब विचारला असता किरण याने रागात येत राहुलला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. व त्याच्याशी झटापट करण्यास सुरु करत चक्क राहुलच्या मांडीला जोरदार चावा घेत जखमी केले. व गळयावरही नखाने ओरबाडले. याप्रकरणी राहुलने वडिल किरणविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून वाकड पोलीस अधिक तपास करीत आहे.


- Advertisement -

हेही वाचा- मगर पाहण्यासाठी पुणेकरांची भिडे पुलावर गर्दी


 

- Advertisement -

 

- Advertisement -