‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात या आस्थापना राहणार सुरू

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे आदेश

Maharashtra mini lockdown new guideline announced

‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र असे असतांनाही नेमके काय सुरू काय बंद याबाबत अजूनही संभ्रम दिसून येतो. ही बाब विचारात घेउन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण सूरज मांढरे यांनी नव्याने आदेश जारी केले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. याबैठकीस महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे वतीने पोलिस उपायुक्त संजय बारकुंडे, आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध मुद्यांवर सर्व सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापनाविषयक सर्व निर्णय घेणे व आदेश पारित करणेबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संपूर्ण जिल्ह्यातील सर्वोच्च संस्था आहे. प्राधिकरणाने घेतलेले निर्णय सर्व विभागांवर बंधनकारक आहेत. तसेच सर्व विभागांनी आपत्ती संदर्भातील कार्यवाही करीत असताना या प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशांचे पूर्णतःअनुपालन करणे या कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील यापुढील सर्व आदेश केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्गमित केले जातील व स्वतंत्रपणे कोणताही विभाग आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पूर्वपरवानगीशिवाय आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील कोणतेही आदेश काढणार नाही, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

काय असेल सुरू, काय असेल बंद
* हॉस्पिटल्स, रोगनिदान केंद्र, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसी
* औषध निर्माण करणार्‍या कंपन्या, सर्जिकल साहित्य आणि चष्मा निर्मिती करणार्‍या आस्थापना
* हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन्स, मंगल कार्यालये बंद राहतील
* खाद्यगृह परवाना असलेले फुड जॉइंट्स, ढाबे येथे थांबून खाण्यास पूर्णतः बंदी
* कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना शेतीशी क्षेत्राशी संबंधित दुकाने
* अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था
* टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्विस सेंटर स्पेअरपार्ट विक्री
* वॉशिंग सेंटर, डेकोर यासारखेच शॉप व केंद्र बंद राहतील.
* पावसाळी पूर्व आणि पूर्व हंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरु असतील