घरताज्या घडामोडी'राजकीय विसंवादातून महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल'

‘राजकीय विसंवादातून महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल’

Subscribe

जरी सरकार कोसळेल तरी भाजपला सरकार बनविण्यात रस नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरकार पाडणे ही आमची संस्कृती नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. राजकीय विसंवादातूनच महविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होतील, असे राजकीय भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी वर्तवले. महाविकास आघाडीच्या सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. हे सरकार कोसळेल तरी भाजपला सरकार बनविण्यात रस नाही. आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर विधानसभा विसर्जित होऊन मध्यावधी निवडणुका होतील. परिणामी निवडणुकीत जनता आपला राग मतपेटीतून व्यक्त करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आम्ही कधीही सत्तेत पुनरागमन करण्याचा दावा केला नाही – चंद्रकांत पाटील

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड होऊन नवी मुंबईतील अधिवेशनात पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही कधीही सत्तेत पुनरागमन करण्याचा दावा केला नाही. आपापसातील वादातून तीन पक्षांचे सरकार कोसळेल हेच आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत, असे पाटील म्हणाले.

- Advertisement -

‘शिवसेना रस्त्यांवरील खड्डे का लपवत आहे?’

पुन्हा सत्तेत येण्याच्या भाजपच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली आहे. यासंदर्भात विचारले असता पाटील यांनी, राष्ट्रवादीने सत्तेची चोरी केली आहे. त्यामुळे मलिक यांना भाजपच्या मानसिक संतुलनाची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला लगावला. अहमदाबादमध्ये झोपड्या झाकण्यासाठी भिंत बांधण्याच्या निर्णयावर शिवसेनेने टीका केली आहे. यावर बोलताना, शिवसेनेने गुजरातमधील गरिबीऐवजी मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर चर्चा करावी. शिवसेना रस्त्यांवरील खड्डे का लपवत आहे? असा सवाल पाटील यांनी केला.

२५ फेब्रुवारीला धरणे आंदोलन

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी तसेच शेतकरी आणि महिला अत्याचाराच्या प्रश्नावर भाजप २५ फेब्रुवारीला राज्यभर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – फडणवीस म्हणतात, ‘मागच्या जन्मीच्या पापांमुळेच महापौर-नगरसेवकपद मिळतं’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -