घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजुने नाशिक पालखी मिरवणुकीच्या नव्या मार्गाला परवानगी नाहीच; समिती मात्र ठाम

जुने नाशिक पालखी मिरवणुकीच्या नव्या मार्गाला परवानगी नाहीच; समिती मात्र ठाम

Subscribe

मुस्लिम समाज पालखीच्या स्वागतासाठी उत्सुक, मात्र तांत्रिक अडचणीत सापडला पालखी मिरवणूक मार्ग

नाशिक : जुने नाशिक मुख्य शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा आयोजित केला आहे. मात्र, मागील १० दिवसापासून परवानगी मागूनही अद्यापही त्यावर ठोस निर्णय आलेला नाहीये. शनिवारी (दि.१८) झालेल्या मंडळ समिती व पोलीस प्रशासनाच्या शेवटच्या बैठकीतही कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. उलट जर त्या मार्गाने पालखी काढली तर पोलीस बळाचा वापर केला जाईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान, शिवजन्मोत्सव समिती त्याच मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यावर ठाम आहे. यामुळे नेमकं शिवजयंतीच्या दिवशी काही संघर्ष निर्माण होतो का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

प्रशासनाचे म्हणणे काय

प्रशासनाची यावर म्हणणे आहे की, कुठलाही नवीन मिरवणूक मार्ग तयार करायचा असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळाची मंत्रालय स्तरावर परवानगी आवश्यक असते त्याचा अधिकार कुठल्याही प्रकारे स्थानिक पोलीस आयुक्तालयाला नसतो. त्याबाबतचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. जर समितीला पारंपरिक मिरवणूक मार्गावरून पालखी काढायची असेल तर त्याला आमची परवानगी आहे.

- Advertisement -
शिवप्रेमींचा रोष आता नेतेमंडळींवर

खरंतर ८ फेब्रुवारी रोजी या समितीने पोलीस प्रशासनाला या नवीन पालखी मार्गाची परवानगी मागितली होती. त्याबाबत आम्ही असा कुठलाही नवीन पालखी मार्गाला परवानगी देऊ शकत नाही, जो पारंपारिक मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गावरून आपण पालखी काढावी असे प्रशासनाकडून समितीला १० फेब्रुवारीला कळवण्यात आलेलं होतं. यानंतर पोलीस प्रशासनाने हा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठवला होता. मात्र, याबाबत स्थानिक नेतेमंडळींकडे पाठपुरावा करूनही त्यावर कुठलाच ठोस निर्णय न झाल्यामुळे आता शिवप्रेमींचा रोष हा नेतेमंडळींवर दिसून येत आहे.

असा आहे पालखी मिरवणूक मार्ग

प्रारंभ- शीतळादेवी मंदिर-शिवाजी चौक-आझाद चौक-चव्हाटा-छपरीची तालीम-शिरीशकुमार चौक-पाटील गल्ली-गजराज चौक-बुधवार पेठ-संत नामदेव पथ-दंडे हनुमान चौक-राम मुक्ती चौक-महात्मा फुले चौक-स्वातंत्र्यवीर चौक

- Advertisement -
मुस्लिम समाज पालखीचे स्वागतासाठी उत्सुक

दरम्यान, या पालखी मार्गाच्या सुरुवातीचा जो भाग आहे. तो मुस्लिम बहुल आहे आणि त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचं बोललं जात होतं. मात्र त्या ठिकाणच्या स्थानिक मुस्लिम बांधवांनी आम्ही शिवाजी महाराजांच्या या पालखीचे दिमाखात स्वागत करू अशा पद्धतीची भावना बोलून दाखवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -