घरताज्या घडामोडीCOVID 4th wave: कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; टास्क फोर्सकडून मार्गदर्शनाची अपेक्षा

COVID 4th wave: कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; टास्क फोर्सकडून मार्गदर्शनाची अपेक्षा

Subscribe

मुंबईत कोविडची तिसरी लाट नियंत्रणात आली असली तरी आता कोविडची चौथी लाटही येण्याच्या तयारीत आहे. कानपूरच्या आयआयटीने जूनमध्ये देशभरात कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्याच्या टास्क फोर्सने या चौथ्या लाटेबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाने केली आहे.

याबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा केली असता, राज्यच्या टास्क फोर्स अभ्यास करून ज्या सूचना करेल त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

- Advertisement -

मुंबईत मार्च २०२० पासून कोविड संसर्गाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत मुंबईत कोविडच्या तीन लाटा आल्या. मात्र सुदैवाने पालिका वैद्यकीय यंत्रणेने राज्याच्या टास्क फोर्सशी सल्लामसलत करून कोविडच्या तिन्ही लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला. परिणामी कोविडची पहिली व दुसरी लाट परतावून लावण्यात आली.आता तिसरी लाटही नियंत्रणात आली आहे.

त्यामुळे रुग्ण संख्याही घटली आहे. मात्र असे असताना जून महिन्यात देशभरात कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता कानपूरच्या आयआयटीने वर्तवली आहे. २२ जून ते २२ ऑक्टोबरपर्यंत ही लाट असणार असून १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक रुग्ण आढळून येतील त्यानंतर चौथी लाट आटोक्यात येईल, असे आयआयटीने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून देशमुखांची कारागृहात चौकशी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -