घरमहाराष्ट्रवांद्रेतील रंगशारदा नाट्यगृहात २२ ऑक्टोबरला वाजणार नाटकाची तिसरी घंटा

वांद्रेतील रंगशारदा नाट्यगृहात २२ ऑक्टोबरला वाजणार नाटकाची तिसरी घंटा

Subscribe

मराठी रसिक आणि नाटकाचे अतूट नातं आहे. मात्र कोरोनामुळे नाट्य रसिकांमध्ये निराशेचे वातावरण होते. मात्र अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता २२ ऑक्टोबरपासून रंगभूमीचा पडदा रसिक प्रेक्षकांसाठी उघडणार आहे. यानिमित्ताने मराठी रंगभूमीसह संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत २२ ऑक्टोबर समारंभपुर्वक रंगशारदा सभागृहात नाटककार विद्याधर गोखले रंगमंचावरून तिसरी घंटा वाजवून नाटकाचा पडदा उघडण्यात येणार आहे. भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

नाटयगृहे उद्यापासून सुरू होत असून गेले अनेक दिवसाच्या प्रितक्षेनंतर उद्या मराठी नाटय रसिक आणि कलावंताची भेट होणार आहे. या निमित्ताने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम येथील रंग शारदा नाटयगृहात “एका लग्नाची पुढची गोष्ट ” या प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या नाटकाचा खास प्रयोग आयोजित केला आहे.

- Advertisement -

यावेळी नाटय रसिकांचे लाल कार्पेट घालून फुल देऊन स्वागत करण्यात येणार असून तिसरी घंटा वाजवून समारंभपुर्वक पडदा उघडण्यात येणार आहे. यावेळी अभिनेत्री मधुरा वेलणकर, अभिनेते जयवंत वाडकर, अमोल गुप्ते, चौरंगचे अशोक हांडे, संगितकार मिलिंद जोशी, कवी आणि अभिनेते सौमित्र, गायिका वैशाली सामंत, सोनाली कर्णिक आणि महेश मांजरेकर यांच्यासह बालनाटयसाठी काम करणा-या “गंधार” या सारख्या संस्थांचे प्रतिनिधी व नाटय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लाँकडाऊनच्या काळात ज्यांनी पडद्यामागच्या कलावंताना, तंत्रज्ञाना विविध स्वरूपात मदत केली अशा व्यक्ती ज्यामध्ये अभिनेते प्रशांत दामले, अशोक हांडे, रत्नाकर जगताप, हरी पाटणकर, बाबू राणे यांचा सन्मान आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -