घरठाणेऐरोली रेल्वे स्टेशनवर चाकूचा वार करून मोबाईल हिसकावून घेणाऱ्या तिघांना अटक

ऐरोली रेल्वे स्टेशनवर चाकूचा वार करून मोबाईल हिसकावून घेणाऱ्या तिघांना अटक

Subscribe

ऐरोली रेल्वे स्टेशनवर एका १६ वर्षीय मुलावर चाकूचा वार करून मोबाईल हिसकावून घेणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी पहाटेच्या दरम्यान घडली. हा मुलगा उल्हासनगरला जाण्यासाठी ऐरोली रेल्वे स्टेशनवर तिकीट काढत होता. परंतु तिकीट काढल्यानंतर तीन अनोळखी इसमांनी त्याच्याकडून पहिल्यांदा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राचा वापर करून हल्ला केला. या प्रकरणातील गुन्हा ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

नेमकी घटना काय?

- Advertisement -

११ ऑक्टोबर रोजी १६ वर्षीय मुलगा रात्री ३ वाजण्याच्या सुमारास ट्रेनची वाट पाहत ऐरोली रेल्वे स्टेशनच्या प्लॅ.नं. 1 वर उभा होता. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्याच्यासोबत धक्कबुक्की केली. त्यानंतर या इसमांनी त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. हा मुलगा त्याचा मोबाईल मागत असताना दुसऱ्या इसमाने त्याच्यावर चाकू हल्ला करत तिघांनीही तेथून पोबारा काढला. सदरचा गुन्हा ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता पोलिसांनी आरोपी आकाश प्रभु भावे (18), आशिष रामनयन यादव (18), रमेश तानाजी सागरे (19) यांना अटक करण्यात आली आहे. परंतु चाकू हल्ला करणारा त्यांचा साथीदार कृष्णा हा अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान ऐरोली स्टेशन येथे फिर्यादी मुलगा वयवर्ष १६ हा उल्हासनगरला जाण्यासाठी तिकीट काढत होता. त्यानंतर त्याला तीन इसमांनी गाठून पहिल्यांदा जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. तसेच मोबाईल परत मिळवण्यासाठी फिर्यादी त्या मुलाकडे गेला असता तीन अनोळखी इसमांपैकी एका इसमाने त्याच्या खिशातून चाकू काढून त्या फिर्यादी मुलाच्या बरगड्यावर मारला आहे. तसेच तो मुलगा जखमी झाला आहे. या घटनेत त्या फिर्यादी मुलाचा मोबाईल देखील चोरून नेण्यात आला आहे. फिर्यादी मुलाचे आई-वडील पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असता त्यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणातील गुन्ह्याची नोंद केली आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. काही सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या अनुषंगाने रबाळे परिसरातून तीन इसमांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून गुन्हा निष्पन्न झाला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु फरारी आरोपी कृष्णा याचा शोध घेत असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली आहे.


हेही वाचा : लटकेंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून महाडेश्वरांना उमेदवारी देण्याचा परबांचा डाव, मनसेचा गंभीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -