घरमहाराष्ट्रपुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

Subscribe

पुणे-सोलापूर महामार्गावर आज दुपारी दीडच्या सुमारास कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर आज दुपारी दीडच्या सुमारास कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिका गाडीचा (क्रमांक MH12 NP 0613) टायर फुटला. त्यानंतर कार डिव्हायडरला ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना धडकली.

अशी घडली दुर्घटना

पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिका गाडीचा टायर फुटला. टायर फुटताच चालकाचा कारवरील ताबा सुटला. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत तिघेही कर्जत मधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तर इर्टिकामधील दोघेजण जखमी झाले आहेत. दौंड येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

काल आंबेनळी घाटात बस कोसळली

काल रात्री आंबेनळी घाटात अक्कलकोट-महाड एसटी बस दरीत कोसळली. सुदैवाने बस एका आंब्याच्या झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात बसचालकासह २७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर महाडमधील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बसचालक एन.पी. खरात यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील किरकोळ जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -