घरक्राइमकॉपी न करू देणाऱ्या शिक्षकावर दगडफेक; शिक्षक गंभीर जखमी

कॉपी न करू देणाऱ्या शिक्षकावर दगडफेक; शिक्षक गंभीर जखमी

Subscribe

नाशिक :  मनमाड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत कॉपी न करू दिल्याने एका शिक्षकाला परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दगडफेक करत जबर जखमी केले आहे. शासनाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असताना या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिक्षक निलेश जाधव सुपर व्हिजन साठी मनमाड शहरातील एच.के. हायस्कूल मध्ये सुपर व्हिजन करत असताना काही विद्यार्थ्यांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. जाधव यांनी त्या विद्यार्थ्यांना टोकले आणि कॉपी करतोय का ?  काय चाललंय तुमचं ? अशी विचारणा केली. याचा मनात राग धरून त्या विद्यार्थ्यांनी इतर बाहेरील काही युवकांना सोबत घेत परीक्षा संपल्यावर जेव्हा शिक्षक निलेश जाधव परीक्षा केंद्रावरून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यावर दगड व विटांनी हल्ला चढवला. या घटनेत जाधव गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

एका बाजूला कॉपीमुक्त अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात असताना पर्यवेक्षक शिक्षकाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून थेट त्या पर्यवेक्षकावर हल्ला झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच पर्यवेक्षक शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या उपद्रवी विद्यार्थी व त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात शिक्षक निलेश जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -