घरमहाराष्ट्रआमचीही त्र्यंबकेश्वरावर श्रद्धा : उरूस आयोजक मतीन सय्यद

आमचीही त्र्यंबकेश्वरावर श्रद्धा : उरूस आयोजक मतीन सय्यद

Subscribe

 

नाशिकः आमचीही त्र्यंबकेश्वरावर श्रद्धा आहे. उरूस पूर्ण गावातून निघतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आम्ही धूप दाखवत असतो. त्यानुसार त्या दिवशी धूप दाखवण्यासाठी आमच्यातील एकजण पुढे गेला होता, असे उरूस आयोजक मतीन सय्यद यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना मतीन सय्यद यांनी व्हायरल व्हिडिओ संदर्भात खुलासा केला. सय्यद म्हणाले, आमचीही त्र्यंबकेश्वरावर श्रद्धा आहे. मंदिराजवळ उरूस गेला की आम्ही तेथे धूप दाखवतो. त्या दिवशी आमच्यातील एकजण धूप दाखवण्यासाठीच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गेला होता. मंदिरात घुसण्याचा आम्ही कोणीच प्रयत्न केला नाही. आमच्याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे, असे मतीन यांनी सांगितले.

13 मे 2023 रोजी रात्री 9:30 ते 10 या वेळेत श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणूकीतील काही इतर धर्मीय व्यक्तींनी उत्तर महादरवाजा येथून समस्त हिंदूधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट अत्यंत गंभीर असून वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महासंघाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसचं असे प्रकार भविष्यात होणार नाही यांची दक्षता घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र ब्राम्हण महासंघाकडून पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही समाजातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

या कथित घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ या वर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनाचीही चौकशी करेल. गेल्या वर्षी एका विशिष्ट जमावाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील मुख्य प्रवेशद्वारातून आता शिरण्याचा प्रयत्न केला होता, याचीही चौकशी होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -